scorecardresearch

रेल्वे रूळ ओलांडताना धाड्धाड् ट्रेन नव्हे मृत्यूच येत होता! अंगावर काटा आणणारा VIRAL VIDEO पाहाच

रेल्वेचे नियम तोडून चुकीच्या पद्धतीने काही प्रवासी रेल्वे रूळ ओलांडत असताना अचानक धाड्-धाड् ट्रेन आली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

Railway-Track -Crossing-Viral-Video
(Photo: Twitter/ AwanishSharan )

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. रेल्वेचे नियम तोडून चुकीच्या पद्धतीने काही प्रवासी रेल्वे रूळ ओलांडत असताना अचानक धाड्-धाड् ट्रेन आली. रुळावरून वेगाने येणाऱ्या रेल्वेवर नजर पडताच काही प्रवासी घाईघाईने रेल्वे रूळ ओलांडत असतात. पण एक महिला मात्र पुरती गोंधळून जाते. यामध्ये ट्रेन तिच्या इतक्या जवळून सुटते की पाहणाऱ्याचा श्वास काही वेळासाठी थांबतो. वेगात येणारी ट्रेन पुढे जाईपर्यंत घाबरलेले कुटुंब तिथेच जमिनीवर बसून होते. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

गब्बर सिंग नावाच्या युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन देखील हटके देण्यात आली आहे. “रिक्षाचे २० रुपये वाचवणारा हा भारत आहे” असं लिहित हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत १ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि जवळपास तितक्याच लोकांनी प्रतिसाद दिला आहे. या व्हिडीओवर कमेंट करताना सुहास रवींद्र नावाच्या युजरने लिहिले की, मी भारतीयांवर प्रेम करतो. हा व्हायरल व्हिडीओ कुठल्या ठिकाणचा आहे याची माहिती अद्याप झालेली नाही. या व्हिडिओला प्रतिक्रिया देताना एकता साह नावाच्या युजरने लिहिले की, मुर्खपणाचा कळस गाठला आहे.

आणखी वाचा : रस्त्यावर चालताना दिसून आला हा रहस्यमयी प्राणी, हा VIRAL VIDEO सारेच जण आश्चर्यचकित

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वाटेत कुठेतरी एक ट्रेन उभी आहे. काही प्रवासी या संधीचा फायदा घेत वेळ वाचवण्यासाठी ट्रेनमधून खाली रेल्वे रूळावर उतरू लागतात. अशा स्थितीत काही प्रवासी वेगाने रेल्वे रूळ ओलांडत असतानाच एक ट्रेन वेगाने येताना दिसतेय. घाबरून लोक पटापट रेल्वे रूळ ओलांडू लागतात. पण एक महिला मात्र गोंधळून जाते. लाल रंगाची पिशवी उचलून ती ट्रॅकच्या पलीकडे पोहोचते, मग अचानक ती बॅग तिथे फेकते आणि परत कुटुंबियांकडे येते. या गोंधळात ट्रेन तिच्या अगदी जवळून जाते. यात एक छोटीशी चूक सुद्धा खूप महागात पडली असती.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : पॅराशूटला विमान लटकवत जमिनीवर उतरवून पायलटने आपला जीव वाचवला!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : डोक्यावर इमारतीचा भाग कोसळणार तितक्यात जिगरबाज बापाने जीवाची बाजी लावून लेकाला वाचवलं…

हा व्हिडीओ सध्या लोक सोशल मीडियावर शेअर करत लोकांना असं धाडस न करण्याचं आवाहन करत आहेत. ती जे काही करत आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे. पण किमान ते सुरक्षित आहेत. एका यूजरने लिहिले की, “अर्ध्याहून अधिक लोक नेहमी घरी लवकर पोहोचण्यासाठी किंवा काही पैसे वाचवण्यासाठी अशा गोष्टी करतात. जर आयुष्य असेल तर तुम्ही पैसे कमवाल आणि तुम्ही स्वतःच्या कामासाठीही याल…अशा मूर्ख गोष्टी करू नका.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-07-2022 at 13:38 IST
ताज्या बातम्या