Emotional viral video: आज आपला देश कितीही पुढे गेला तरी समाजात अजूनही असे लोक आहेत ज्यांची मानसिकता अत्यंत चुकीची आहे. आजही असे लोक आहेत जे वर्गभेद, वर्णभेद, भेदभाव करतात जे अत्यंत चुकीचे आहे. आजही असे लोक आहेत जे इतरांना कमी लेखतात, त्यांच्या कामावरून त्यांना कमी लेखतात जे अत्यंत चुकीचे आहे. कोणतंही काम लहान की मोठं नसते याचा विसर अनेकांना पडतो.

अनेक वेळा आर्थिक अडचणी आणि जबाबदाऱ्यांमुळे लोकांना आपली स्वप्नं बाजूला ठेवून मेहनतीचं काम करावं लागतं. अशा वेळी त्यांना टोमणे नव्हे, तर समजून घेणं आणि पाठिंबा मिळणं गरजेचं असतं. अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून आनंद होतो, तर काही व्हिडीओ मन भावूक करतात. सध्या व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ असाच आहे, जो पाहून अनेकांना अस्वस्थ वाटत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी रोष व्यक्त केला आणि समाजातील चुकीच्या मानसिकतेवर टिका केली आहे

पाहा व्हिडीओ

लोकांना ही गोष्ट सहन होणं कठीण वाटलं, कारण सार्वजनिक ठिकाणी काम करताना एखाद्याचा अपमान करणं चुकीचं आहे. आजकाल बेरोजगारी, महागाई आणि कौटुंबिक जबाबदारी तरुणांवर मोठा ताण आणतात. अशा परिस्थितीत प्रामाणिकपणे काम करून स्वतःच्या पायावर उभं राहणं लज्जास्पद नाही तर खरंच अभिमानाची गोष्ट आहे, असं अनेकांनी म्हटलं.

या व्हिडीओखाली सोशल मीडियावर खूप संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. नेटकऱ्यांनी त्या तरुणीच्या वागणुकीवर जोरदार टीका केली आणि पिझ्झा डिलिव्हरी बॉयच्या बाजूने उभे राहिले. “तो नायक आहे, कारण तो प्रामाणिक मेहनत करून पैसे कमावतोय आणि कोणावरही ओझं नाही,” अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली; तर दुसऱ्याने, “ती फक्त मैत्रीण म्हणून नाही तर माणूस म्हणूनही अपयशी आहे,” असं स्पष्टपणे म्हटलं.अनेकांनी आपले अनुभव शेअर करत सांगितलं की, शाळेतले मित्र पुन्हा भेटल्यावर त्यांच्या नोकरी, पैसा किंवा पदावरून नव्हे तर त्यांच्या स्वभावावरून आणि माणुसकीवरून नातं ठरवलं पाहिजे. काही युजर्सनी हा व्हिडीओ खोटा किंवा स्क्रिप्टेड असावा अशीही आशा व्यक्त केली.