Viral Video : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) च्या बसेस नी दरदिवशी हजारो लोक प्रवास करतात. एसटीबसमधील अनेक गमती जमतीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी ड्रायव्हर, कंडक्टर रिल्स बनवताना दिसतात तर कधी एसटीत गाणी म्हणताना दिसतात. कधी प्रवासी कंडक्टरमध्ये वाद घालताना दिसतात तर कधी कंडक्टर प्रवाशांना तिकिटासाठी जाब विचारताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला प्रवासी कंडक्टरबरोबर वाद घालताना दिसत आहे. कंडक्टर महिला प्रवासीला तिकीट काढण्यास सांगतो पण त्यावर महिला प्रवासी जे उत्तर देते, ते पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हा व्हायरल व्हिडीओ एका एसटी बसमधील आहे. या बसमध्ये तुम्हाला एका सीटवर बसलेल्या महिला प्रवासीला तिकीट काढण्यास कंडक्टर सांगतो.

कंडक्टर – ताई आयडी कशासाठी असतो?
महिला प्रवासी – म्हणजे मी आहे म्हणून
कंडक्टर – मग आपल्या तिकीटाचं
महिला प्रवासी – मी देणार आहे.
कंडक्टर – मी पंधरा दिवसाच्या आत देते किंवा एका महिन्याच्या आत पण मी पेड करणार
कंडक्टर – तस्सं नाही चालत ताई
महिला प्रवासी – तसं चालत नाही, मला माहितीये.
कंडक्टर – फोन पे असेल ना, फोन पे करा ना
महिला प्रवासी – फोन पे पण नाही
कंडक्टर – मला घरी जावं लागेल
महिला प्रवासी- तुम्हाला जावं लागेल आम्हाला जावं लागेल. हे पण कस्टमर चालले
कंडक्टर – ते पैसे देऊन चालले
महिला प्रवासी – घरी आल्यावर काय करायचं ते करा
कंडक्टर – घरी नसते.. या बस प्रायव्हेट नाही
महिला प्रवासी – बसस्टॉपवर उतरल्यावर देते
कंडक्टर – अगं ताई तिकीट घ्यावं लागतं
महिला प्रवासी – मग मी काय म्हणलं
कंडक्टर – तिकीट द्या म्हणतो, काय २०० २५० रुपयांचं तिकिट नाही
महिला प्रवासी – माझ्याकडे काहीच नाही नाहीतर मी दिले असते ना
त्यानंतर हा व्हिडीओ येथेच संपतो. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Guru Ast 2025: नवीन वर्षात २७ दिवसांनी अस्त होणार गुरू! ‘या’ राशींची होणार चांदी, झटपट वाढेल पगार

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : ‘सतर्क राहून, कुशलतेने आव्हानांचा सामना’, नव्या गव्हर्नरांचे धोरणसातत्यावर भर राखण्याचे प्रतिपादन

r_lalpuri या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “प्रवासी तिकिट काढत नाही वाहकाने तरी काय करावे?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “तिच्याकडे तिकिटाला पैसे नाही पण तीचा आवाज पहा” तर एका युजरने लिहिलेय, “खाली उतरवा अशा प्रवाशांना” आणखी एका युजरने लिहिलेय, “हा पॅसेंजर मनोरुग्ण दिसतोय… उतरवा त्यांना खाली.” एक युजर लिहितो, “अर्धी तिकीट असूनही तिकीट काढत नाही म्हणजे यावरून कळतं की लोकांना फुकट पाहिजे सर्व” तर एक युजर लिहितो, “आमचा धाराशिव जिल्हाच आगळा वेगळा आहे , इथे डोक्याच दहीच केल जातं”