Couple Shocking Video Viral : ट्रेनमध्ये छोट्या-मोठ्या गोष्टींवरून प्रवाशांमध्ये वादविवाद होत असतात. रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन करून रोमॅन्स करतनाचे काही कपलचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. क्षुल्लक कारणांवरून प्रवाशांमध्ये भांडण झाल्याचे व्हिडीओ इंटरनेटवर समोर आल्यावर नेटकरीही त्यांच्यावर टीकेची झोड उठवतात. अशातच आता दिल्ली मेट्रोच्या एका व्हायरल व्हिडीओनं धुमाकूळ घातला आहे. यामध्ये एक महिला एका कपलसोबत भांडण करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, एका मुलीने प्रवासी महिलेला पागल म्हटलं. त्यानंतर त्या महिलेचा पारा चढला आणि त्या मुलीला जोरात ढकलून दिलं. त्यानंतर त्या कपलने त्या जागेवरून जाण्याचा प्रयत्नही केला. परंतु, त्या महिलेनं या जोडप्याशी शाब्दिक चकमक सुरुच ठेवली आणि त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. संतापलेल्या महिलेची वागणूक पाहून ती मुलगी म्हणाली, काय वेडेपणा आहे हा…पण महिलेनं काहीही ऐकून घेतलं नाही. तसंच तक्रार करण्याची धमकीही दिली.

नक्की वाचा – घराच्या भिंतीत लपला होता किंग कोब्रा, शेपटीला हात लावताच अंगावर धावला अन्…व्हिडीओ पाहून थरकाप उडेल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इथे पाहा ट्रेनमधील प्रवाशांच्या भांडणाचा व्हिडीओ

महिलेला पागल म्हटल्यानं धावत्या ट्रेनमध्ये वादाची ठिणगी पडली. कपलने महिलेला पागल म्हटल्यावर ती महिला संतापली आणि त्यांच्याशी जोरजोरात भांडण करू लागली. त्यानंतर त्या कपलला राग आला आणि त्यांनीही या महिलेला कडक शब्दात प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. दिल्ली मेट्रोतील प्रवाशांचं हे भांडण कॅमेरात कैद झालं असून व्हिडीओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनीही भांडण करणाऱ्या प्रवाशांना प्रतिक्रियांच्या माध्यमातून सुनावलं आहे.