पतीच्या सवयीला कंटाळलेल्या महिलेनं त्याला ऑनलाइन विकायला काढलं; पुढे जे घडलं ते वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

महिलेने आपल्या पतीपासून नाराज होऊन त्याला ऑनलाइन विकण्याची जाहिरात दिली.

(फोटो- सोशल मीडिया)

नवरा-बायकोमध्ये वाद, भांडण होणं ही सामान्य गोष्ट झाली आहे. या भांडणातून रागात घर सोडून जाणं, मारहाण होणं किंवा घटस्फोट झाल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. पण पतीच्या काही सवयींना कंटाळलेल्या एका महिलेनं जे केलं ते ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या महिलेनं चक्क आपल्या पतीला ऑनलाइन विकायला काढलंय.

न्यूझीलंडच्या वेबसाइट स्टफने दिलेल्या वृत्तानुसार, न्यूझीलंडमधील लिंडा मॅकअलिस्टर नावाच्या महिलेने आपल्या पतीपासून नाराज होऊन त्याला ऑनलाइन विकण्याची जाहिरात दिली. तिने तिच्या पतीचे प्रोफाइल बनवले आणि उत्पादन विक्रीच्या वेबसाइटवर पोस्ट केले. या जाहिरातीत लिंडा मॅकअलिस्टरने पतीची खासियत, किंमत यासह अनेक महत्त्वाची माहिती पोस्ट केली आहे.

लिंडा मॅकअलिस्टरच्या पतीला फिरण्याची, भटकंतीची मोठ्या प्रमाणात आवड होती. कधी-कधी तो मुलांना सोडून बाहेर फिरायला निघून जायचा. लिंडा मॅकअलिस्टरला हीच गोष्ट आवडली नाही. लाख नकार देऊनही नवरा नाही, तिचा नवरा ऐकायला तयार नव्हता. मग संतापलेल्या लिंडाने नवऱ्याला ऑनलाइन विकायला काढलं. तिची ही नवऱ्याला ऑनलाइन विकण्याची पोस्ट जगभरात व्हायरल झाली आहे.

महिलेनं दिलेली जाहिरात..

महिलेने पतीची दिसेली खासियत अशी की, ‘६ फूट १ इंच उंच, वय ३७ वर्ष, व्यवसायाने शेतकरी.त्याला चांगला आहार दिला तर तो प्रामाणिक आहे. कोणीही त्याला विकत घेतल्यास मोफत शिपिंग दिली जाईल,’ असेही महिलेने सांगितले.

मेट्रोच्या वेबसाईटवर दिलेल्या बातमीनुसार, लिंडा मॅकअलिस्टरच्या पतीचे नाव जॉन मॅकअलिस्टर आहे. जॉनची चूक एवढीच आहे की तो पत्नी आणि मुलांशिवाय बाहेर फिरायला निघून जातो. ही संपूर्ण घटना विनोदी वाटत असली तरी लिंडाने आपल्या पतीला धडा शिकवण्यासाठी असे पाऊल उचलले. या जोडप्याचे २०१९९ मध्ये लग्न झाले आणि त्यांना दोन मुले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Woman sales husband online viral news hrc

Next Story
बोलण्याची संधी मिळाली नाही म्हणून ‘नाचू’ लागली महिला; लाइव्ह टीव्ही डिबेट दरम्यानचा Video Viral
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी