Viral Video: ‘जुगाड’ ही अशी एक गोष्ट आहे जो प्रत्येकजण करतो. याविषयीचे अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत. कोणताही वेळ न वाया घालवता तुम्ही ‘जुगाड’च्या मदतीने लहान-मोठे काम चुटकीसरशी करू शकता. भारतीयांना जुगाड करण्यात नंबर वन मानले जाते. आपण दिवसभरातल्या अनेक अशा गोष्टी आहेत ज्या जुगाड करून करतो. आता या बाईलाच बघा ना… प्रवासात कमीत कमी जागेत तुम्ही जास्तीचे सामान कसे घेऊन जाऊ शकता यापेक्षा चांगले कोणी सांगू शकत नाही.

सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दाखवण्यात आले आहे की एखादी व्यक्ती किती हुशारीने आपले सामान पॅक करू शकते. तुम्हालाही ही ट्रिक नक्कीच शिकली पाहिजे. कोणत्याही लांबच्या प्रवासादरम्यान तुम्हाला याचा फायदा होईल. ट्विटरवर शेअर केलेल्या क्लिपमध्ये एक महिला काळ्या पिशवीत एक मोठं ब्लॅंकेट भरत असल्याचे दिसत आहे.

( हे ही वाचा: Viral Video: भल्यामोठ्या अजगराला कोंबडीची हाव नडली… क्षणात झाला बंदिस्त; नेमकं काय घडलं पाहा)

काय आहे या व्हिडीओमध्ये?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिला आधी बॅगमध्ये मोठे ब्लॅंकेट भरते आणि त्या बॅगमध्ये व्हॅक्यूम क्लिनरचे नोजल टाकते. काही सेकंदात, ब्लॅंकेट जादूप्रमाणे अगदी अर्ध्या आकारात संकुचित होते. त्यामुळे मोठ्या ब्लॅंकेटने भरलेली जागा एकदम सुटसुटीत होते. ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले आहे…. अधिक सामान घेऊन जाणाऱ्यांसाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरू शकते.

येथे पाहा जुगाड करतानाचा व्हिडिओ

( हे ही वाचा: CCTV: चक्क पोलीसानेच केली चोरी! बंद दुकानाबाहेरील बल्ब चोरल्याच्या घटनेने उडाली खळबळ; पाहा Viral Video)

महिलेने केलेल्या या जुगाडाला खूप पसंती दिली जात आहे, हा व्हिडिओ आतापर्यंत सुमारे एक लाख वेळा पाहिला गेला आहे आणि अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. एका यूजरने अप्रतिम उत्तर दिले आहे. त्याने लिहीले आहे….एक प्रश्न आहे की व्हॅक्यूम क्लिनर सोबत घ्यायचा का?? येतानाही असंच करावं लागेल ना.