Viral Video of a Woman on a Bus: मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हसवतात, काही विचार करायला भाग पाडतात, तर काहींचा नेमका अर्थच लागत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आला असून, बसमध्ये घडलेल्या या घटनेने नेटकऱ्यांमध्ये उत्सुकतेसोबतच संभ्रमही निर्माण केला आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये बसमधील एक महिला अचानक विचित्र हालचाली करताना दिसते. सुरुवातीला बसमधील इतर प्रवासीही तिच्याकडे आश्चर्याने पाहत असतात. काही क्षणांतच तिच्या हालचाली आणखी वेगवान होतात आणि बसमधील वातावरण पूर्णपणे बदलून जाते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक जण वेगवेगळे तर्क लढवीत आहेत.

आधार कार्ड मागितल्यानंतर महिलेचं वागणंच बदललं?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दाव्यानुसार, बसमधील वाहकाने महिलेकडे तिकिटाबाबत विचारणा करताना तिला आधार कार्ड दाखवण्यास सांगितले. मात्र, ओळखपत्र दाखविण्याऐवजी ती अचानक विचित्र पद्धतीने हातवारे करू लागली आणि नाचल्यासारख्या हालचाली करू लागली.

या घटनेनंतर काही प्रवासी गोंधळले, तर काही जण तिच्याकडे कुतूहलाने पाहू लागले. काहींनी हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केला आणि काही वेळातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

सोशल मीडियावर दाव्यांचा पाऊस

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी वेगवेगळे दावे करण्यास सुरुवात केली. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी ‘आधार कार्ड’ हा शब्द ऐकताच महिलेच्या अंगात देवीचा संचार झाल्याचा दावा केला; तर काहींनी हा प्रकार अंधश्रद्धेशी जोडला.

मात्र, या दाव्यांना कोणताही अधिकृत आधार उपलब्ध नाही. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या हालचालींचे नेमके कारण काय होते, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला.

एका नेटकऱ्याने लिहिले, “ताई, आधी तिकिटाचे पैसे द्या आणि मग देवीला शांत करा.”

दुसऱ्या एका वापरकर्त्याने प्रतिक्रिया देताना म्हटले, “या महिलेची थट्टा करण्यापेक्षा तिला वैद्यकीय मदतीची गरज आहे का, याचा विचार केला पाहिजे.”

तर काहींनी हा व्हिडीओ केवळ मनोरंजनासाठी तयार करण्यात आला असावा, अशीही शक्यता व्यक्त केली आहे.

सत्य काय?

या व्हिडीओत दिसणाऱ्या घटनेमागे नेमके कारण काय होते, याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. महिलेच्या हालचालींमागे धार्मिक कारण होते, आरोग्याशी संबंधित समस्या होती की हा केवळ व्हायरल कंटेंट होता, याबाबत निश्चित माहिती उपलब्ध झाेलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर केले जाणारे दावे सत्य मानण्यापूर्वी त्याची पडताळणी केली जाणे आवश्यक आहे.

अखेर ही घटना कुठली?

मीडिया रिपोर्टसनुसार, हा व्हायरल व्हिडीओ कर्नाटकमधील एका बसमधील असल्याचा दावा केला जात आहे. तो @newskarnataka या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. मात्र, या घटनेबाबत संबंधित प्रशासनाकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण किंवा पुष्टी केली गेल्याचे अद्याप समोर आलेले नाही.

येथे पाहा व्हिडीओ

(महत्त्वाची सूचना : ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ आणि त्यासोबत करण्यात आलेल्या दाव्यांवर आधारित आहे. व्हिडीओतील दावे किंवा घटनेची सत्यता स्वतंत्रपणे पडताळली गेलेली नाही. त्यामुळे त्याकडे सावधगिरीने पाहणे आवश्यक आहे.)