सोशल मीडियावर काही तरी आश्चर्यचकीत करणाऱ्या घटना समोर येत असतात. व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून रोज नवी माहिती समोर येत असते. आता अर्जेंटीनातून एक अशीच बातमी समोर आली . आइसक्रीम पार्लरमध्ये एक महिला विनामास्क आल्याने कर्मचाऱ्यांनी रोखलं. मात्र त्यानंतर त्या महिलेनं केलेली कृती पाहून उपस्थित लोक हैराण झाले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली असून सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. महिलेला कर्मचाऱ्यांनी मास्क नसल्याने दुकान येण्यास मनाई केली. तसेच मास्क असेल घालण्याची विनंती केली. तेव्हा महिलेने कपडे काढत ते तोंडाला बांधले. त्यामुळे महिला फक्त अंतर्वस्त्रात होती.
तिची ही ट्रीक काही कामी आली नाही. कारण कपडा चेहऱ्यावर व्यवस्थित राहात नव्हता. त्यामुळे महिला कुणालाही काही न बोलता आइसक्रिम पार्लरमधून निघून गेली. या घटनेवेळी एक व्यक्ती आपल्या तीन मुलींसह तिथे उपस्थित होता. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, ही घटना १ जानेवरीला रात्री १०.४० मिनिटांनी पश्चिम अर्जेंटीनाच्या मेंडोजाच्या गोडॉय क्रुझ शहरातील घडली. घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, एक व्यक्ती तीन मुलींसह आइसक्रिम घेण्यासाठी उभा आहे. तितक्यात एक महिला पार्लरमध्ये येते. मास्क न घातल्याने कर्मचारी तिला अडवतात. नाराज होत महिला शॉर्ट काढते आणि चेहऱ्यावर बांधते. ही कृती पाहून उपस्थित व्यक्तीला लाजल्यासारखं झालं आणि तो इतरत्र पाहायला लागला.




त्या महिलेसोबत १० जण आणखी असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र कुणीही मास्क घातलं नव्हतं. अखेर त्यांच्यापैकी एक जण मास्क मिळवण्यात यशस्वी झाला आणि आपल्या ग्रुपला आइसक्रिम घेऊन गेला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर हजारो लोकांनी पाहिला असून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. सध्या ओमायक्रॉन व्हायरस वेगाने पसरत असल्याने मास्क न घातल्याने अनेक जण टीका करत आहेत.