बंगळुरू म्हटलं की प्रत्येकाच्या मनात वाहतूक कोंडीचे चित्र उभे राहते. बंगळुरूतील वाहतूक कोंडीच्या समस्येचे अनेक बातम्या, व्हिडीओ रोज समोर येत असतात. तेथील नागरिक या वाहतूक कोंडीमुळे वैतागले आहे. नागरिकांचे काही तास फक्त वाहतूक कोंडीमध्येच जात असल्यामुळे अनेकांची प्रचंड चिडचिह होत असते. कित्येकजण सोशल मीडियावर याबाबत रोष व्यक्त करत असतात.

दरम्यान, पुन्हा एकदा बंगळुरूची वाहतूककोंडी चर्चेचा विषय ठरली आहे. वाहतूक कोंडीत तासनतास अडकल्यानतंर लोकांचा संताप होत असतो या वेळेचा सदुपयोग करणाऱ्या नागरिकाच्या कथा सोशल मीडियावर अनेकदा समोर आल्या आहेत. सध्या इंटरनेटचे लक्ष वेधून घेतलेल्या अशाच एका पोस्टमध्ये एका महिलेने वाहतूक कोंडीमध्ये अडकलेली असतानाही तिच्या वेळेचा सदुपयोग केला आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

ट्विटर म्हणजेच एक्सवर प्रिया नावाच्या अकाउंटवरून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे, ज्यामध्ये कारच्या सीटवर ठेवलेल्या सोललेल्या वाटाण्याच्या पिशव्याचे फोटो दिसतो आहे. कॅप्शनमध्ये “वाहतूक कोंडीमध्ये अकडलेल्या वेळेचा सदुपयोग करणे” असे लिहिले आहे.

हेही वाचा – जीव मुठीत घेऊन मुंबई लोकलमध्ये चढणाऱ्या महिलांचा व्हिडीओ होतोय व्हायरल; सुरक्षेच्या मुद्यावरून पेटला नवा वाद

पोस्ट केल्यानंतर अल्पावधीमध्येच पोस्ट चर्चेत आली. एकाने गंमतीमध्ये म्हटले की, ”हे मी माझ्या बॉसला पाठवणार आहे.” तर दुसऱ्याने प्रियाच्या कल्पकतेचे कौतूक केले.

हेही वाचा – संपत आलेल्या सॉसच्या बाटलीमधून सॉस कसा काढावा बाहेर? तरुणीने केला भन्नाट जुगाड; पहा Viral Video

यापूर्वी, शहरातील वाहतूक कोंडी दरम्यान दरम्यान दुचाकीवर बसून लॅपटॉपवर काम करताना दिसलेल्या महिलेचा फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो पोस्ट करताना यूजरने “बंगुळरूमध्ये वाहतूक कोडींमधील एक क्षण” असे कॅप्शन या पोस्टला दिले होते.

Story img Loader