महागडे सामान खरेदी करणे आणि त्याचा वापर करण्याची हौस असते. पण त्या वस्तू सांभळणे सर्वांनाच जमत नाही. अमेरिकेच्या मिशिगणमध्ये एका महिलने महागडे ॲपल वॉच खरेदी केले. पण तिला ते नीट सांभळता आले नाही. महागड्या ॲपलच्या नादात शौचालयात अडकली महिला. जोरजोरात ओरडू लागल्यानंतर लोकांनी थेट पोलिसांनाच बोलावले.
शौचालयात पडले ॲपलचे वॉच
ही महिला फिरायला निघाली होती. दरम्यान, ती आऊटहाऊसमध्ये शौचालय वापरण्यासाठी गेली तेव्हा तिचे घड्याळ शौचालयात पडले. महिला घड्याळ शोधण्यासाठी आणि परत मिळवण्याचासाठी प्रयत्न करू लागली. त्यानादात ती शौचायलामध्ये वाईटरित्या अडकली. शेवटी जेव्हा महिला निघू शिकली नाही तेव्हा तिने आरडा ओरडा सुरू केला.




हेही वाचा – “बाप्पा, मोबाईलकडे बघ..” फोटो काढण्यासाठी चिमुकलीने लाडक्या गणरायाला दिली साद, गोंडस व्हिडिओ होतोय व्हायरल
महिलेचा आरडा-ओरडा ऐकून लोकांनी पोलिसांना बोलावले
महिला शौचालयाच्या खाली शोषखड्यात ती उतरली जिथून तिला निघता येत नव्हते. आसपासच्या लोकांना जेव्हा ओरडण्याचा आवाज ऐकला तेव्हा पोलिसांना कळवले. पोलिस जेव्हा तिथे पोहचले तेव्हा महिलेची स्थिती पाहून थक्क झाले. आउटहाऊस टॉलेटच्या खाली एक खड्डा आहे. महिला घड्याळ शोधण्यासाठी त्यात उतरली आणि अडकली. तिला त्यातून बाहेर येता येत नव्हते.
घडनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी महिलेला बाहेर काढले आणि तिची चौकशी केली तेव्हा तिने सांगितले की, तिचे ॲपलचे घडल्या पडले होते जे शोधण्यासाठी ती खड्यात उतरली होती आणि अडकली होती. पोलिसांनी महिलेला एक बेल्टच्या सहाय्याने ओढून बाहेर काढले तेव्हा कुठे ती बाहेर निघाली.
हेही वाचा – मोदक बनवण्यापासून सजावटीपर्यंत, लाडक्या बाप्पाच्या घरात सुरू आहे उंदीर मामांची लगबग, Viral Video एकदा पाहाच
पोलिसांनी लोकांना सल्ला दिला आहे की, जर आऊटहाऊस शौचारयात एखादी वस्तू पडली तर त्यात जाण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे गंभीर दुखापत होऊ शकते. सुदैवाने महिलेच्या ओरड्याचा आवाज लोकांनी ऐकला अन्यथा तिच्या जीवावर बेतले असते.