Viral video of woman attempting suicide: गेल्या काही वर्षांत आत्महत्यांचं प्रमाण वाढत चालल्याचं दिसून येतंय. मानसिक तणावातून अनेक लोक आता आत्महत्येचा पर्याय निवडू लागले आहेत. काही लोकांना स्वत:चंच आयुष्य जड झाल्यासारखं वाटू लागलं आहे. आयुष्यात होणाऱ्या त्रासाला कंटाळून लोक टोकाचा निर्णय घेऊन स्वत:ला संपवतायत. अशात आत्महत्येबाबतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरदेखील व्हायरल होत असतात. असे व्हिडीओ पाहून काळजाचा ठोकाच चुकतो.

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक महिला रेल्वेसमोर येऊन आत्महत्येचा प्रयत्न करताना दिसते. पण, तिचा हा प्रयत्न एका माणसामुळे अयशस्वी ठरला. नेमकं घडलं तरी काय? जाणून घ्या.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
Viral shocking accident while overtaking The Car Fell From The Bridge While Overtaking Accident Video
अंगावर काटा आणणारा अपघात, पुलावरून कार थेट खाली कोसळली; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कुणाची?
a friend saved life of his friend by using presence of mind
VIDEO : मित्राच्या प्रसंगावधानाने वाचला तरुणाचा जीव, नेटकरी म्हणाले, “शंभर नातेवाईक असण्यापेक्षा एक असा मित्र हवा”
Passengers inside metro over seat issues shocking video goes viral on social media
हद्दच झाली! मेट्रोमध्ये एका सीटसाठी महिलेने ओलांडली मर्यादा; VIDEO पाहून संतापले लोक
burst crackers on the bike
“भावा, आई-वडिलांचा विचार करायचा…“, बाईकवर बसून फोडले फटाके अन् पुढे जे घडलं; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

हेही वाचा… चूक कोणाची? भरवेगात आला अन् चालत्या स्कूटरचा केला चुरा, अपघाताचा VIDEO पाहून उडेल थरकाप

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. या व्हिडीओत रेल्वेस्थानकावर नेहमीसारखी गर्दी दिसत आहे. तेवढ्यात अचानक प्लॅटफॉर्मवर उभी असलेली एक महिला रुळाजवळ धावत जाते आणि त्याच क्षणी तिथून ट्रेन येत असते. आत्महत्या करण्याच्या विचारात असलेली ही महिला धावत जाताना लगेच मागून एक माणूस धावत जातो आणि तिचा हात पकडून तिला मागे खेचतो. हे करताना त्या माणसाला थोडी दुखापतही होते; पण तो त्या महिलेचा हात मात्र सोडत नाही. हे दृश्य पाहून रेल्वेस्थानकावर जमलेले सगळे लोक सतर्क होतात आणि त्या महिलेकडे धावत जातात.

हा धक्कादायक व्हायरल व्हिडीओ @heart_touchinghub या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला रेल्वे कर्मचाऱ्याने वाचवले’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. यादरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकलेले नाही.

हेही वाचा… VIDEO: पायांच्या मधोमध ठेवला फटाका अन्…, तरुणाचा जीवघेणा स्टंट पाहून व्हाल थक्क

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिले, “तिला वाचवताना भावाच्या डोक्याला जबर मार लागला.” दुसऱ्याने, “खरा हीरो,” अशी कमेंट केली. “आयुष्य फुकट मिळतं का?”, अशी कमेंटही एकाने केली.

दरम्यान, याआधीही अशा अनेक घटना रेल्वेस्थानकाजवळ घडल्या आहेत; जिथे अनेकांनी आपला जीव देण्याचा प्रयत्न केला आहे. अशा घटनांमध्ये अनेकांचा जीव वाचतो; तर काही जण आपलं आयुष्य गमावून बसतात. सध्या व्हायरल झालेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे.