Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेक जण आवडीने व्हिडीओ शेअर करत असतात. काही व्हिडीओ थक्क करणारे असतात तर काही व्हिडीओ मजेशीर असतात. तर काही व्हिडीओ शिकवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही लोक आपल्या कामाप्रती खूप प्रामाणीक असतात. असे लोक काहीही झालं तरी आपलं काम चोख पार पाडतात. दरम्यान सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला मुलांना पोलिओ डोस पाजण्यासाठी बर्फातून १५ किलोमीटर चालत जाते. एवढ्या थंडीत महिलेचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला दिसत आहे. ती बर्फावर चालत आहे. यावेळी तिच्याजवळ एक मोठा डबाही लटकलेला दिसतो. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटत असेल की, ही महिला बर्फात कुठे जात आहे? ही महिला आरोग्य सेविका आहे. ज्यांचे नाव निर्मला देवी असल्याचे सांगितले जात आहे. हिमाचलमधील कुल्लू जिल्ह्यातील मुलांना पोलिओचे औषध देण्याचं या काम करतात. निर्मला देवी अशा भागात जातात जिथे बर्फामुळे गाडी पोहटू शकत नाही. बर्फाळ हवामानात त्या १५ किलोमीटर चालत जाऊन मुलांना पोलिओचे डोस, गोळ्या देतात. त्या गावातील ५६ मुलांना हे औषध देतात. लोक आरोग्य सेविका निर्मला देवी आणि त्यांच्या धाडसाचे कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Till 1st June 2024 Mangal Gochar in Meen rashi Mahavisfot Angarak Yog on Hanuman Jayanti
१ जूनपर्यंत मीन राशीत ‘महाविस्फोट अंगारक’ योग; ‘या’ राशींचा भाग्योदय; प्रचंड धनासह प्रत्येक कामात मिळेल गती
live in relationship old age marathi article
समुपदेशन : वृद्धत्वात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ?
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> जंगलाची राणी सिंहीणीला भिडणारे हे प्राणी कोण? घेरून केला जबर हल्ला; पण शेवटी आला वेगळाच ट्विस्ट, VIDEO पाहाच

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @nsharmajagran नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत २२ हजार वेळा पाहिला गेला आहे. यावरही लोकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरवर कमेंट करताना त्याने लिहिले की, ‘एका अंगणवाडी सेविकेचा मुलगा असल्याने पोलिओ मोहीम यशस्वी करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते हे मी समजू शकतो…