VIRAL VIDEO : अरे हे काय? साडीवर ब्लाऊज घालायला विसरली? त्याऐवजी मेहंदी काढली…हटके फॅशन स्टाईल पाहून लोक हैराण

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून सुरूवातीला तुम्हाला वाटेल की ही महिला साडीवर ब्लाऊज घालायला विसरली की काय? पण हिने ब्लाऊज ऐवजी मेहंदी डिझाईन काढलीय. पाहा हा VIRAL VIDEO

woman-wearing-henna-blouse-with-saree-viral-video
(Photo: Instagram/ thanos_jatt)

साडी हा सर्वात सुंदर पारंपारिक पोशाखांपैकी एक आहे आणि यात काही शंकाच नाही. सहावारी साडीवर हल्ली आकर्षक डिझाइनमध्ये नवनवीन प्रयोग केलेल्या वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज परिधान करण्याचा हल्ली नवा ट्रेंडच सुरूय. कोणत्याही साडीचं रुप खुलून दिसतं ते साडीसोबत कॅरी केलेल्या ब्लाऊजमुळे. पण काळानूरुप ब्लाऊजचा ट्रेंड सतत बदलत असतो. काही दिवसांपूर्वी मॅचिंग अथवा कॉन्ट्रास्ट ब्रॉकेड ब्लाऊजची फॅशन होती. पण आता यात एका नव्या ब्लाऊजच्या फॅशनने भर घातलीय. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून सुरूवातीला तुम्हाला वाटेल की ही महिला साडीवर ब्लाऊज घालायला विसरली की काय? पण थोडं थांबा. कारण या महिलेने ब्लाऊजऐवजी थेट मेहंदी काढलीय. ही फॅशन स्टाईल पाहून तुम्हाला थोडं विचित्र वाटेल, पण सध्या अशाच ब्लाऊज फॅशनचा ट्रेंड सुरूये. पाहा हा VIRAL VIDEO

ब्लाऊजशिवाय साडी अशी फॅशन आली तर ? होय. तुमचा विश्वास बसणार नाही, पण सध्या अनोख्या ब्लाऊज फॅशनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आलाय. या व्हायरल व्हिडीओमध्ये महिलेने साडीवर ब्लाऊज घालण्याऐवजी मेहंदी डिझाईन काढलीय. तिच्या व्हायरल व्हिडीओमुळे लोक हैराण होत आहेत. व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये दिसणाऱ्या महिलेने पांढऱ्या रंगाची चिकनकारी साडी नेसलेली दिसत आहे. मात्र, तिने यावर मॅचिंग ब्लाऊजऐवजी हिना ब्लाउज घातला होता. ब्लाऊजच्या आकारात अंगावर तिने आकर्षक मेहंदी डिझाइन काढलेली आहे. ही मेहंदी अगदी हुबेहुब ब्लाऊजसारखात दिसून येत आहे.

या अनोख्या ब्लाऊजच्या फॅशनमुळे ही महिला सोशल मीडियावर बरीच चर्चेत आलीय. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सुरूवातीला तिने एका मेहंदी कलरचा ब्लाऊज परिधान केल्यासारखा भास होतो. पण काही वेळाने असं वाटू लागतं की ही महिला कदाचित साडीवर ब्लाऊज घालण्यास विसरली की काय? पण हा व्हिडीओ आणखी निरखून पाहिला की कळतं की ते ब्लाउज नसून मेहंदीची डिझाईन आहे.

आणखी वाचा : मसाला स्ट्रॉबेरी! कधी चव चाखली आहे का? VIRAL VIDEO पाहून नेटिझन्स संपातले

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : थंडी वाजते म्हणून मुलीने ओढणी मागितली, तर पाहा आई काय म्हणाली?

thanos_jatt नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. त्यानंतर हा अनोख्या ब्लाऊजच्या फॅशनमुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ८० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच हजारो लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला असून कमेंट्स सेक्शन वेगवेगळ्या संमिश्र प्रतिक्रियांनी भरलेला आहे.

आणखी वाचा : बाप रे बाप! एवढा मोठा अजगर तुम्ही कधी पाहिला नसेल, VIRAL VIDEO पाहून उडेल थरकाप…

एका युजरने कमेंट करत लिहिलं की, “आता मेहंदी काढणं शिकावं लागणार आहे.” तर आणखी दुसऱ्या युजरने लिहिलं, “फॅशनच्या नावाने काहीही सुरू करायचं?” तर काही युजर्सनी मेहंदी ब्लाऊजची डिजाईन काढणाऱ्या कलाकाराच्या टॅलेंटचं कौतुक केलंय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Woman wearing henna blouse with saree goes viral internet reacts henna blouse video with saree surprised to see unique style prp

ताज्या बातम्या