Dhurandhar: The Revenge गेल्याच आठवड्यात जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे आणि प्रदर्शित होण्याआधीच १०० कोटींचा गल्ला या सिनेमाने पार केला होता. सध्या प्रत्येकालाच धुरंधर पाहण्यासाठीची उत्सुकता आहे. हा सिनेमा तब्बल ३ तास ४९ मिनिटांचा असल्याने वर्किंग प्रोफेशनल्सना तो पाहण्यासाठी आवर्जून आणि काम मॅनेज करून वेळ काढावा लागत आहे. याचंच एक उदाहरण म्हणजे अलिकडेच एका इन्फ्लुएन्सरने धुरंधरच्या शोदरम्यान लॅपटॉपवर काम करणाऱ्या एका महिलेचा फोटो शेअर केला.
सिनेमागृह हे शांत बसून छानसा सिनेमा पाहण्याची जागा आहे. अनेकांचे फोनही इथे सायलेंट मोडवर असतात. धुरंधर-२ पाहताना प्रक्षेकांची उत्सुकता तर शिगेला आहेच, पण त्यातही एक महिला आपली आवड आणि आपली जबाबदारी दोन्ही निभावताना दिसली. अंधारात लॅपटॉप लुकलुकत होता. सिनेमाच्या क्लायमॅक्सच्या वेळी ई-मेलचा आवाज येत होता. रात्री ११च्या शोसाठी आलेली ही महिला तेव्हासुद्धा ऑफिसचं काम करताना दिसली.
कॉर्पोरेट जगातील प्रचंड कामाच्या बोजामुळे जीवनशैलीत झालेला हा बदल एक मोठा प्रश्न निर्माण करतो. ही धावपळीची जीवनशैली एखादा थ्रिलर सिनेमा पाहण्यासारखा साधा आनंदही कॉर्पोरेट मजदूरकडून हिरावून घेत असल्याचं चित्र आहे. डेडलाईनचा पाठलाग होत असताना आवडही जपावी लागते. बंगळुरूमधील एका खचाखच भरलेल्या सिनेमागृहातील एका फोटोवर नेटकऱ्यांनी जबरदस्त कमेंट्स केल्या आहेत.
बंगळुरूमधील एका सिनेमागृहात रात्री ११ वाजता धुरंधर-२ या स्पाय थ्रिलर शोदरम्यान लॅपटॉपवर काम करत असलेल्या महिलेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. इंस्टाग्राम युजर खुशी बत्रा हिने सनेमा सुरू असताना अंधाऱ्या हॉलमध्ये तिची एकाग्रता टिपली.
अदित्य धर दिग्दर्शित धुरंधर-२ हा सिनेमा १९ मार्च रोजी जगभरात प्रदर्शित झाला. धुरंधरच्या पहिल्या भागाने जगभरात सुमारे १३०० कोटींची कमाई केली होती.
रात्री ११च्या शोमध्ये सुद्धा ही महिला काम करत असल्याने हा फोटो आणखी व्हायरल झाला. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तो वर्क फ्रॉम सिनेमा हॉल अशा कमेंट केल्या.
दरम्यान या फोटोवर नेटकऱ्यांनी बऱ्याच संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तिच्या डेडिकेशनचे कौतुक केले, तर काहींनी प्रोडक्टिव्हिटीचा कळस म्हटले आहे. काही नेटकऱ्यांनी म्हटले की, ती काम करत होती पण आम्हाला त्रास होत होता म्हणून संताप व्यक्त केला.
