Womans Fight Video : सोशल मीडियावर लहानसहान कारणांवरून झालेल्या भांडणाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात लोक एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी तर कधी लाठ्या काठ्यांनी मारहाण करताना दिसतात. पण, आता नळावरील भांडणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यात दोन महिला एकमेकींना चक्क पाण्याच्या हंड्याने मारताना दिसतायत. या व्हिडीओच्या कमेंट्समध्ये युजर्स ‘हंडा फाइट’ म्हणत खूप मज्जा घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन महिला पाणी भरण्यासाठी एका सार्वजनिक नळावर पोहोचतात, जिथे आधीच अनेक जण हंडे रांगेत ठेवून उभे असतात. यावेळी त्या दोन महिलांमध्ये काही गोष्टीवरून वाद होतो. या वादाचे रुपांतर चक्क हाणामारीत होते. यानंतर दोघीही एकमेकांना चक्क स्टीलच्या हंड्याने मारू लागतात. दोघींमधील भांडणाचे कारण काय असावे हे समजू शकलेले नाही, पण दोघी एकमेकांच्या डोक्यात चक्क हंडा मारतात.

यावेळी एकीच्या हातातून हंडा निसटतो आणि खाली पडतो, याचा फायदा घेत दुसरी महिला तिच्या डोक्यात हंड्याने मारत राहते. अखेर दोघींचे भांडण सोडवण्यासाठी तिसरी महिला मध्यस्ती करते, पण तिथे उपस्थित इतर महिला मात्र भांडण सोडवायचं टाकून आरामात बघत उभ्या राहतात.

हसतं खेळतं वातावरण अचानक बदललं दु:खात! तरुणाचा मित्रांसमोरच अवघ्या सेकंदात मृत्यू; थरारक Video व्हायरल

महिलांच्या भांडणाचा हा व्हिडीओ @gharkekalesh या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. जो पाहून युजर्सदेखील खूप मज्जा घेत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘ही खरोखर एक चांगली लढाई आहे, जी अधिक चांगल्या शस्त्रांनी लढली जात आहे.’ दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘हे पाहून खूप मजा आली’; इतकेच नाही तर काही युजर्स या भांडणाची तुलना बाहुबली चित्रपटाच्या ॲक्शनशीही करत आहेत.