नाताळाचा सण जगभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तुमच्यापैकीही अनेकांनी ऑफिसमध्ये सिक्रेट सॅण्टा हा खेळ खेळला असणारा. तुम्ही कोणाचा तरी सिक्रेट सॅण्टा झाला असाल तर कोणीतरी तुम्हाला विश लिस्टनुसार गिफ्ट दिलं असेल. पण मिशिगनमधील एका महिलेला तिच्या सिक्रेट सॅण्टाने चक्क ३७ किलो वजनाची गिफ्ट्स दिली आहेत. आता तुम्ही म्हणाला असा कोण होता तिचा सिक्रेट सॅण्ट. तर या महिलेचा सिक्रेण्ट सॅण्टा होता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारी व्यक्ती म्हणजेच मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स. हो हे खरं आहे. खरोखरच या अनोळखी मुलीला गेट्स यांनी ३७ किलो वजनाच्या खूप सारे गिफ्ट्स पाठवले.

मेल ऑनलाइनने दिलेल्या माहितीनुसार मिशिगनमदील शेल्बे या ३३ वर्षीय महिलेने रेडइटगिफ्टसच्या सिक्रेट सॅण्ट या स्पर्धेत भाग घेतला होता. या ऑनलाइन स्पर्धेमध्ये कोणतीही अनोळखी व्यक्ती सिक्रेट सॅण्टा म्हणून भाग घेणाऱ्यांना गिफ्ट पाठवते. या स्पर्धेमध्ये बिल गेट्स दरवर्षी आवर्जून भाग घेतात. यंदाही त्यांनी भाग घेतला होता आणि त्यांना शेल्बेचे नाव मिळाले. त्यामुळे त्यांनी या महिलेला तिने मागितलेली विश लिस्टमधील गिफ्ट्स तर पाठवलीच शिवाय इतरही अनेक गिफ्ट्स तिच्यासाठी पाठवली.

फोटो सौजन्य: डेलीमेल युके

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार शेल्बेला मिळालेली गिफ्ट इतकी होती की त्या गिफ्टचे बॉक्स तिच्या कारच्या डिकीमध्ये मावत नव्हते. अखेर तिने बॉक्स फोडून टप्प्या टप्प्यांमध्ये ही गिफ्ट्स घरी नेली.

गिफ्ट्स होती तरी काय?

या गिफ्ट्समध्ये हॅरी पॉर्टर सॅण्ट हॅट, हॉगवर्ड्स कॅसल, आरटूडीटू पझल (याची विक्री खूप आधीच बंद झाली आहे), हॅरी पॉर्टर आणि स्टारवॉर्ल लिगो सेट, हाताने विणलेलं जाड ब्लॅकेट, ट्विन पिक्स शोसंदर्भातील खास भेटवस्तू, एल. एल. बीन जॅकेट, ट्विन पिक्सचे दुसरे पर्व, द ग्रेट गॅट्सबे हे पुस्तक आणि हे पुस्तक लिहिणारे लेखक एफ स्कॉट फित्झरलॅड यांनी स्वत: लिहीलेली चिठ्ठी, खूप सारे ओरिओ बिस्कीटचे बॉक्स आणि इतर छोटीमोठी गिफ्ट्स यात होती.

आईच्या नावाने…

शेल्बेच्या आईचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे बिल गेट्स यांनी तिला एक खास पत्र लिहिले आहे. “तुझ्या आयुष्यात झालेली हानी भरुन काढता येण्यासाठी नाही. त्यामुळेच एक छोटा प्रयत्न म्हणून मी तुझ्या दिवंगत आईच्या नावाने हृद्यरोगांसंदर्भात काम करणाऱ्या अमेरिकन हार्ट असोसिएशनमध्ये देणगी दिली आहे,” असं या पत्रात गेट्स यांनी म्हटलं होतं. तसेच देणगी दिल्याचा पुरावा म्हणून गेट्स चेक सही करतानाचे काही फोटोही या गिफ्ट बॉक्समध्ये होते.

 

सध्या सोशल नेटवर्किंगवर शेल्बेला मिळालेल्या गिफ्टचीच चर्चा आहे.