scorecardresearch

डबल चीन वर उपाय शोधायला गेली अन.. पाल होऊन आली! या महिलेच्या बाबत घडलं असं काही की…

डबल चीन घालवायची म्हणून ही महिला सोशल मीडियावर गेली आणि लोकांचं ऐकून तिने केलेली शस्त्रक्रिया इतकी महाग पडली की…

डबल चीन वर उपाय शोधायला गेली अन.. पाल होऊन आली! या महिलेच्या बाबत घडलं असं काही की…
डबल चीन वर उपाय शोधायला गेली अन (फोटो: ट्विटर/ @TheCosmeticLane)

सोशल मीडियावर आपल्या समस्या मांडून अनेकदा आपल्याला सुचणार नाही अशी उत्तरे सुद्धा सापडून जातात. आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ऑनलाईन शोधण्याची म्हणूनच प्रत्येकाला सवय लागली आहे. पण सारासार विचार न करता असे काही पाऊल उचलल्यास आपल्याला मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. युनाइटेड किंगडम मधील एका महिलेच्या बाबत असेच काहीसे घडले आहे. डबल चीन घालवायची म्हणून ही महिला सोशल मीडियावर गेली आणि लोकांचं ऐकून तिने केलेली शस्त्रक्रिया इतकी महाग पडली की त्वचा एखाद्या पालीसारखी दिसू लागली आहे.

सोशल मीडियावर या महिलेचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. ही महिला म्हणजे ५९ वर्षीय असून त्यांचे नाव जेन बोमन असे आहे.काही महिन्यांपासून डाएट करून जेन यांनी वजन कमी केले होते. त्यांनतर त्यांचा हनुवटीचा भाग सैलसर झाल्याने मानेकडे झुकू लागला होता. यावर त्यांना अनेकांनी सर्जरी करून घेण्याचा सल्ला दिला. यावर पर्याय शोधत असताना काही ब्युटी ट्रीटमेंट कंपन्यांनी त्यांना स्किन टाइटनिंग करून घेण्याचे सुचवले व जेन त्यासाठी तयार झाल्या.

जेन यांनी तब्बल ४० हजार खर्च करून फ्राइब्लोप्लास्ट प्लाझ्मा ही बोटॉक्स प्रक्रिया करून घेतली, हा प्रयोग अपेक्षेविरुद्ध फसला. यामुळे जेन यांची डबलचीन तर गेली नाहीच पण उलट त्वचेवर लाल रंगाचे चट्टे उमटू लागले. हे डाग एखाद्या पालीच्या त्वचेसारखे काटेरी दिसू लागले. जेन म्हणतात की हे पुरळ नुसते वाईट दिसतच नाही तर यामुळे त्यांना प्रचंड जळजळ व वेदना होत आहेत. खरंतर या प्रक्रियेदरम्यान त्यांना हा त्रास जाणवू लागला होता पण त्यांच्यवर ट्रीटमेंट करणाऱ्यांनी हे सामान्य असल्याचे सांगितले. जेन यांनी ब्युटिशियन विरुद्ध पोलिसात तक्रार केली असून आता यावर त्या उपाय शोधत आहेत.

लग्नाच्या ५४ वर्षानंतर जोडप्याला मिळाली गोड बातमी; विज्ञानाचा चमत्कार ठरला यशस्वी

कितीतरी वेळा डबल चीन मुळे फोटो खराब आल्याच्या तक्रारी तुम्हीही ऐकल्या असतील, केल्याची असतील. खरंतर तुम्ही तयार असल्यास तज्ज्ञांकडून अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात काही गैर नाही मात्र योग्य ती काळजी न घेतल्यास असा भलताच अनर्थ होऊ शकतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.