scorecardresearch

Premium

Video: महिलांची एसी लोकलमध्ये तुफान हाणामारी, सीटवरुन सुरु झालेली भांडणं ते लाथा-बुक्क्यांची बरसात

Mumbai local: जागेच्या वादातून महिलांमध्ये तुफान मारामारीचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. सध्या असाच एक एसी लोकलमधला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

women fight for seat in mumbai ac local train video viral news in marathi Spirit of Mumbai
AC लोकलमध्ये महिलांची हाणामारी

मुंबई लोकल ट्रेनला मुंबईच हृदय म्हणतात. लोकल ट्रेन बंद पडली तर मुंबईच थांबते. अशी ही मुंबईचा जीव असणारी लोकल ट्रेन सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. मुंबई लोकलमधील भांडणाचे आणि मारामारीचे सत्र वाढतच चालले आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्रेनमध्ये झालेल्या मारामारीचे आणि भांडणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये महिलांमधील हाणामारी काही नवीन नाही. जागेच्या वादातून महिलांमध्ये तुफान मारामारीचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. सध्या असाच एक एसी लोकलमधला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिलांमध्ये बसण्याच्या जागेवरुन जोरदार भांडणं सुरु आहेत, दरम्यान या व्हिडीओमधील लक्षवेधी बाब म्हणजे ही भांडणं एसी लोकलमध्ये सुरू आहेत. मुंबईत एसी ट्रेनचं तिकिट सामान्य लोकलच्या तुलनेत १० पट महाग आहे. त्यामुळे या ट्रेननं आर्थिकदृष्ट्या सधन लोकच प्रवास करतात. बरं, सधन मंडळी ही तुलनेत शांत असतात उगाचच भांडणं करत नाहीत असा एक समज आहे. पण या महिलांची भांडणं पाहिल्यानंतर मात्र सामान्य लोकल ट्रेनच्या हाणामारी परवडल्या असं म्हणायची वेळ येईल. कारण एक महिला जागा मिळाली नाही म्हणून चक्क जबरदस्तीनं दुसऱ्या महिलेच्या मांडीवर बसण्याचा प्रयत्न करतेय. अन् ती महिला तिला अक्षरश: ढकलून पाडतेय. बरं त्यांची भांडणं जरी इंग्रजीमध्ये सुरू असली तरी त्यांचा आवेश मात्र देसीच आहे.

Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
Ajit Pawar on Sharad Pawar Praful Patel Photo
पक्षातील बंडखोरीनंतरही शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांचा एकत्र फोटो, चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: धावत्या बसमध्ये गिअरची दोरी प्रवाशाच्या हातात, ड्रायव्हरचा खतरनाक जुगाड, प्रवाशांचा जीव मात्र टांगणीला

दरम्यान, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही काळजात धस्स होईल. नेटकऱ्यांना ही घटना अजिबात आवडलेली नाही. त्यांनी यासंबंधीच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये नोंदवल्या आहेत. मुंबई लोकलमध्ये अशा घटना घडण्याच्या संख्येमध्ये वाढ होत चालली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-06-2023 at 17:17 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×