women flaunt pm modi trump body paint tattoos at surat in gujarat | Loksatta

नवरात्रीमध्येही दिसून आली मोदींची क्रेझ; गरब्यासाठी महिलांनी पाठीवर काढले मोदी-ट्रम्प यांचे टॅटू

नवरात्रीमध्येही मोदींची क्रेझ पाहायला मिळत आहे. गुजरातमध्ये महिला पाठीवर ‘WELCOME TO SURAT MODI JI’ टॅटू बनवत आहेत.

नवरात्रीमध्येही दिसून आली मोदींची क्रेझ; गरब्यासाठी महिलांनी पाठीवर काढले मोदी-ट्रम्प यांचे टॅटू
photo(social media)

सध्या नवरात्री सुरू असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाला आहे. ठिकठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुजरात मध्येही नवरात्री सण दिमाखात साजरा केला जातो. यावेळी गुजरातमध्ये नवरात्रोत्सवात गरब्याच्या सजावटीत टॅटूचा ट्रेंड बदलला आहे. महिलांच्या पाठीवर हाऊडी मोदी कार्यक्रम, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट, चांद्रयान-2, कलम 370, 35A आणि सुधारित मोटार वाहन कायदा नियमांसह पर्यावरण वाचवणे यासारख्या मुद्द्यांचे टॅटू गोंदवले जात आहेत.

पीएम मोदींनी नुकतीच संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या सत्रादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचीही भेट घेतली होती. या सभांची जादू पंतप्रधानांच्या गृहराज्य गुजरातमध्ये पहायला मिळत आहे.पाठीवर, हातावर आणि खांद्यावर बनवले जात असणाऱ्या टॅटूमुळे सुरतमध्ये नवरात्रोत्सवासाठी तरुणांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

( हे ही वाचा: Video: गावातील माणसाने ट्रकला बनवला चालता फिरता लग्नमंडप हॉल; आनंद महिंद्रा म्हणाले ‘मला भेटायचे आहे…’)

( हे ही वाचा: Video: माणूस घेत होता चित्त्याबरोबर सेल्फी, नंतर झाले असे की…. पाहून तुमचाही थरकाप उडेल)

इथल्या गरब्यात सहभागी तरुण-तरुणींच्या पाठीवर, बाजूला आणि खांद्यावर बनवलेले टॅटू लोकांना प्रत्येक गोष्टीची जाणीव करून देत आहेत. टॅटू आर्टिस्ट दर्शन गोविल यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाचा नवरात्रोत्सव ७ ऑक्टोबरपर्यंत आहे. गरब्यासाठी टॅटू काढणाऱ्यांची संख्या सुरुवातीपासून एक-दोन दिवसांपेक्षा जास्त असेल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-09-2022 at 09:45 IST
Next Story
नोकरी मिळवण्यासाठी महिलेने लढवली अजब शक्कल; केकवरच छापून पाठवला अर्ज; पाहा काय उत्तर मिळालं