Viral Video : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना डान्स करायला आवडतो. हल्ली अनेक जण डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. काही डान्स व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. अनेक जण ट्रेंडिग रिल्सवर किंवा गाण्यावर व्हिडीओ बनवतात. लहान मुले, तरुण तरुणीबरोबर आता चाळीशी पन्नाशीतली माणसं सुद्धा आवडीने व्हिडीओ बनवतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुंबईच्या चाळीतील काही महिला एका गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून कोणीही थक्क होईल. हा व्हिडीओ मुंबईच्या भांडुप परिसरातील आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (women in Mumbai Bhandup chawl dance so gracefully)

हेही वाचा : आजोबांचे बायकोवर किती ते निस्वार्थ प्रेम! वटवृक्षाची पूजा करण्यासाठी स्वत: गाडीवर घेऊन आले आजीला, VIDEO एकदा पाहाच

मुंबईच्या चाळीतील महिलांनी केला तुफान डान्स

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एका चाळीत सहा महिला डान्स करताना दिसत आहे. या सहा महिला ‘सामी’ आणि ‘लाजरान साजरा मुखडा’ या दोन गाण्याच्या एकत्रित व्हर्जनवर डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की सुरूवातीला महिलांनी कुर्ती घातली आहे आणि त्या सामी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्यानंतर लगेच व्हिडीओमध्ये एक फ्लॅश पडतो आणि त्याच महिला साडी नेसून दिसतात आणि लाजरान साजरा मुखडा या मराठमोळ्या गाण्यावर डान्स करतात. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. त्या अप्रतिम असा डान्स करताना दिसत आहे. त्यांचा उत्साह पाहून तुम्हालाही ऊर्जा येईल.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : चक्क शाहरुख- सनीचा आवाज काढत विकतो पाणी पुरी, टॅलेंटेड तरुणाचा VIDEO होतोय व्हायरल

mansi.gawande.73 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सामीबरोबर मराठी तडका” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हिरव्या साडी नेसलेल्या काकी मला नेहमी आवडतात. काकी, लय भारी. असाच आनंद घ्या आणि हसत रहा” तर एका युजरने लिहिलेय, “मराठी गाणं लय भारी” आणखी एका युजरने लिहिलेय, “बाईपण भारी देवा” एक युजर लिहितो, “आयुष्यामध्ये आनंद खूप महत्त्वाचा आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर चाळ आहे”