टाटाने आपल्या वाहनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड लोकप्रियता कमवली आहे. टाटाचे वाहन हे सुरक्षेचे प्रतिक समजले जाते. आज एसयूव्ही मार्केटमध्ये टाटाची वाहने धुमाकूळ घालत आहेत. टाटा नेक्सॉनची तर तूफान विक्री होत आहे. सफरी, हॅरियर ही वाहने एमजी, फॉर्च्युनर सारख्या वाहनांना आव्हान देणाऱ्या ठरत आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या यशामागे कुणाचे हात आहे हे ऐकूण तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि अभिमानही वाटेल.

टाटाच्या सफारी आणि हॅरियर या दमदार आणि अनेक फीचरनीयुक्त एसयूव्ही या महिला कर्मचारी बनवत आहेत. होय हे खरे आहे. या वाहनांची संपूर्ण असेंबली लाईनच महिला चालवत आहेत. टाटाच्या या असेंबलीमध्ये १५०० महिला कर्मचारी मेहनत करून आपल्यासाठी ही शक्तीशाली एसयूव्ही तयार करतात.

(अबब.. इन्स्टाग्राम वापरले म्हणून १८ वर्षीय तरुणीला चक्क ६ वर्षांचा तुरुंगवास! रशियात चालले तरी काय? जाणून घ्या..)

टाटा मोटर्सने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तुम्हाला टाटा मोटर्सची असेंबली लाईन दिसून येईल. यामध्ये महिला वाहन असेंबल करताना तुम्हाला दिसून येईल. ही वाहने बनवताना आपल्याला शक्तीशाली झाल्यासारखे वाटत असल्याचे एक महिला कर्मचारी आनंदाने सांगते. कार तयार झाल्यावर महिलाच कारची चाचणी करतात. कार सुरक्षित आहे की नाही याची खात्री करतात.

२०-२५ वर्षांच्या तरुणी करतात काम

असेंबली लाईनध्ये १ हजार ५०० महिला काम करतात. या तरुणींचे वय २० ते २५ वर्षांपर्यंत आहे. सुरुवातील आमच्यावर या कामासाठी विश्वास दाखवण्यात आला नाही. मात्र टाटाने विश्वास दाखवला असे एक कर्मचारी व्हिडिओमध्ये सांगत कंपनीच्या कामकाजावर समाधान व्यक्त करते. टाटामुळे जॉब आणि घर दोन्ही चांगल्याने सुरू असून एक दिवस आपल्या मेहनतीच्या जोरावर टाटाचे वाहन घेणार असल्याचा विश्वास एक महिला कर्मचारी व्यक्त करते.

देशावर बेरोजगारीचे सावट असताना टाटाची अ‍ॅड खरच सुखावणारी आहे. १ हजार ५०० महिलांना कंपनीत रोजगार मिळाला आहे. विशेष म्हणजे, मेड इन इंडियाचे स्वप्नही पूर्ण होत आहे, तसेच महिलांना रोजगार मिळाल्याने त्यांचे सक्षमीकरण देखील होत आहे. महिला कुठल्याच क्षेत्रात मागे नाही. वाहन निर्मितीतही ते मोलाचे योगदान देत आहेत, हे खरच अभिमानास्पद आहे.