अनेकदा कामाच्या ठिकाणी, शाळेत परीक्षा असेल तेव्हा अनुभवी भक्ती आपल्याला एक वाक्य आवर्जून सांगताना दिसतात. ते म्हणजे हार्ड वर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क कर. हार्ड वर्क म्हणजे एखादे काम खूप मेहनत घेऊन करणे. तर स्मार्ट वर्क म्हणजे एखाद कठीण काम सोप्या पद्धतीने स्वतःचे डोकं लावून करणे. तर आज सोशल मीडियावर याचे एक उत्तम उदाहरण पाहायला मिळालं आहे. दुकानातील अनेक सायकल पॅक करण्यासाठी एका महिलेनं अजब युक्ती वापरली आहे ; जे पाहून तुम्ही थक्क व्हाल इतकं नक्की.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, दुकानात अनेक सायकल ठेवलेल्या असतात. तसेच या महिला कामगाराचे या सायकलला प्लास्टिक घालण्याचे काम असते. महिला सुरवातीला एक मोठी प्लास्टिकची पिशवी घेते आणि आपण फुग्यात हवा भरतो अगदी त्याप्रमाणे ही या मोठ्या पिशवीत हवा भरून घेते. तुमच्या डोळ्यांची पापणी झपकताच ती सायकलला हे प्लास्टिक कव्हर अगदी सहज घालते. एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडीओ.

हेही वाचा…Leap Year 2024: दर चार वर्षांनी येणाऱ्या लीप वर्षाचे महत्त्व काय? ‘ते’ कसे ओळखले जाते? जाणून घ्या

व्हिडीओ नक्की बघा :

पॅकिंगच्या कौशल्यावर प्रभुत्व मिळविण्यासाठी सराव आणि प्रयत्न आवश्यक आहेत. तसेच व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, या महिलेसाठी मोठ्या सायकली पॅक करणे ही काही मिनिटांची बाब आहे. तसेच महिलेच्या या कौशल्याचे गुपित काय हे जाणून घेण्याची प्रत्येक नेटकाऱ्याची उत्सुकता कमेंटमध्ये दिसून येत आहे.

महिला आजूबाजूची हवा प्लास्टिकमध्ये गोळा करते आणि हवेने भरलेले प्लास्टिक सायकलच्या दिशेने ढकलते व सायकल सहज पॅक होते ; जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. सोशल मीडियावर ही पोस्ट @gunsnrosesgirl3 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून महिलेच्या काम करण्याच्या रचनेचं आणि कौशल्याचे कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत. एकूणच सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांच लक्ष वेधून घेतलं आहे.