एखादा खास कार्यक्रम असेल तेव्हा घर, मंदिर आदी ठिकाणी भजन-कीर्तन आवर्जून ठेवण्यात येते. अनेकांना भजन-कीर्तन ऐकायला आणि सादर करायला खूप आवडते. मुंबई लोकलमध्येही पुरुषांच्या डब्यात तुम्ही अनेकदा गाणी किंवा भजन गाताना नक्कीच ऐकलं असेल. तर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत महिलांचा एक गट मेट्रोत खाली बसून कीर्तन सादर करताना दिसला आहे.
व्हायरल व्हिडीओ दिल्ली मेट्रोचा आहे. मेट्रोत महिलांचा ग्रुप वर्तुळाकार बसला आहे. तसेच या महिला मेट्रोत खाली बसून कीर्तन सादर करीत आहेत. महिला कीर्तनादरम्यान टाळ्या वाजवताना आणि जप करताना दिसून येत आहेत. यादरम्यान आजूबाजूच्या अनेक महिला कीर्तनात मंत्रमुग्ध झालेल्या दिसून येत आहेत. तसेच मेट्रोत उपस्थित अनेक महिला टाळ्या वाजवत महिलांना साथसुद्धा देत आहेत. मेट्रोत महिलांनी सादर केलेलं हे कीर्तन तुम्हीसुद्धा एकदा व्हिडीओतून नक्की बघा.




हेही वाचा…ज्या गाडीचं वडिलांनी आयुष्यभर स्वप्न पाहिलं…मुलांनी तिचं गाडी गिफ्ट केली; VIDEO पाहून डोळे पाणावतील
व्हिडीओ नक्की बघा :
मेट्रोत महिलांनी सादर केले कीर्तन :
तुम्ही आतापर्यंत घरी, मंदिर किंवा आजूबाजूच्या परिसरात मंडप बांधून भजन-कीर्तन करणाऱ्या मंडळींना पाहिलं असेल. पण, इथे तर चक्क महिलांनी मेट्रोत कीर्तन सुरू केलं आहे आणि महिला प्रवाशांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मेट्रोत उपस्थित असलेल्या एका तरुणीनं हा व्हिडीओ तिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला आहे; जो सध्या खूप व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ndc.delhi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून काही जण सकारात्मक; तर काही नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसले आहेत. एका युजर म्हणाले आहे की, डान्स व अश्लील कृत्यांपेक्षा हा व्हिडीओ कितीतरी पटींनी चांगला आहे. तर दुसरा युजर म्हणतो आहे की, प्रत्येक गोष्ट करण्याची एक जागा ठरलेली असते. महिला कीर्तन गात आहेत म्हणून या व्हिडीओला समर्थन दिले जात आहे, अशी एका युजरने कमेंट केली आहे.