scorecardresearch

Navratri 2022 : मुंबई लोकल ट्रेनमधला गरबा पाहिलात का? हा VIRAL VIDEO तुम्हाला सुद्धा थिरकण्यास भाग पाडेल

प्रवाशांना पाय ठेवायला जागा नसते, अशा लोकलमध्ये गर्दीत महिला गरबा कसा खेळतायत, हे पाहून नेटकऱ्यांना आश्चर्य वाटू लागलं आहे.

Navratri 2022 : मुंबई लोकल ट्रेनमधला गरबा पाहिलात का? हा VIRAL VIDEO तुम्हाला सुद्धा थिरकण्यास भाग पाडेल
(Photo: Twitter/ Mumbai Railway Users)

Garba In Mumbai Local Train: सध्या सगळीकडे नवरात्रीचा उत्साह दिसून येतोय. नऊ दिवसांचा हा सण देशभरात मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. यंदा दोन वर्षानंतर नवरात्रीचा सण साजरा करता येत असल्याने प्रत्येकजण या सणाचा आनंद घेताना दिसून येतोय. सण कोणताही असो…मुंबई लोकलमध्ये तो साजरा झाला नाही, असं कधीच होत नाही. मुंबई लोकल म्हटलं की महिलांची भांडणं, धक्काबुक्की असंच चित्र डोळ्यासमोर येतं. पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय त्यात महिला चक्क गरबा खेळताना दिसतायत. मुंबई लोकलमधल्या भर गर्दीत या महिला अगदी दिलखुलासपणे गरबा खेळताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ज्या लोकलमध्ये एरवी चढल्यानंतर साधं पाय ठेवण्यासाठी सुद्धा जागा नसते, अशा मुंबई लोकलमध्ये महिला कशा पद्धतीने एकत्र येत गरब्याचा आनंद घेत आहेत. यावेळी या सर्व महिलांनी गोल रिंगण करत स्वतः गरब्याची गाणी गात हा गरबा डान्स केलाय. नवरात्रौत्सवात सगळीकडे धूम सुरू असताना मात्र नोकरी करणाऱ्या महिलांना मात्र या आनंदाला मुकावं लागतं. दररोजप्रमाणेच घरची कामं आवरून कामावर निघावं लागतं. संध्याकाळी काम संपवून घरी येता येता उशीर होत असल्याने संध्याकाळच्या गरब्यालाही जाता येत नाही. त्यामुळे या सर्व महिलांनी कामावर जाण्यासाठी पडकलेल्या मुंबई लोकल ट्रेनमध्येच गरबा सादर करून नवरात्रौत्सवाचा आनंद लुटला आहे.

आणखी वाचा : Navratri 2022 : माजी पालकमंत्री आदिती तटकरे यांचा गरबा डान्स; पाहा Viral Video

यावेळी गरबा खेळताना महिलांचा आनंद आणि उत्साह पाहण्यासारखा होता. या महिला लोकलमधून दररोज प्रवास करतात. रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून थोडा वेळ काढत महिलांनी लोकलमध्ये गरबा करत इतर प्रवाशांचाही विरंगुळा केला. कल्याणवरून सकाळी १०.०२ वाजता सुटणाऱ्या एसी लोकलमधला हा व्हिडीओ असून इथल्या प्रवाशांनी हा सोहळा आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. बघता बघता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला.

आणखी वाचा : मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर तरूणांनी केला गरबा डान्स; आनंद महिंद्रा म्हणाले, “गुजरातमधून माझा विरोध…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : इराणमध्ये मुस्लिम महिला अचानक केस का कापू लागलेत? कारण…

Mumbai Railway Users नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ शेअर करून अवघे २४ तासही उलटले नाहीत तर या व्हिडीओला आतापर्यंत १ लाख ५४ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोक या व्हिडीओचा भरपूर आनंद घेताना दिसत आहेत. व्हिडीओ पाहणारे युजर्स महिलांचे कौतुक करताना थकत नाहीत. व्हिडीओ पाहून महिलांची करमणूक किती मजेदार होती याचा अंदाज लावता येतो. इंटरनेटवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ लोकांना खूप आवडू लागलाय. प्रवाशांना पाय ठेवायला जागा नसते, अशा लोकलमध्ये गर्दीत महिला गरबा कसा खेळतायत, हे पाहून नेटकऱ्यांना आश्चर्य वाटू लागलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या