लहान मुलं सांभाळणे ही अजिबात सोपी गोष्ट नाही. सतत लक्ष ठेवावे लागते. जरा लक्ष इकडे तिकडे होईपर्यंत मुलं काही ना काही उद्योग करून ठेवतात. पण पालकच निष्काळजीपणा करत असतील तर मुलांच्या जीव धोक्यात येऊ शकतो. अनेकदा पालक अशा गोष्टी करतात ज्यामुळे मुलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका रेल्वेस्थानकावरील आहे. सरकता जीना चढताना दोन महिला एका चिमुकल्याचा आणि स्वत:चा जीवही धोक्यात घालत आहे.

सरकते जीने आज काल सर्वत्र पाहायला मिळतात. मॉलमध्ये, रेल्वे किंवा मेट्रो स्टेशनवर. या सरकत्या जीन्यामुळे लोकांचे जीना चढण्या-उतरण्याचे कष्ट कमी होतात पण अनेकदा तांत्रिक बिघाड झाल्याने हे जीने बंद पडतात किंवा योग्य काळजी न घेतल्यास मोठा अपघातास कारणीभूत ठरू शकतात त्यामुळे सरकता जीना चढताना योग्य काळजी घेणे महत्त्वाचे असते. अनेक लोकांना सरकत्या जीन्यावर चढताना भिती वाटते तर अनेकांना मज्जा वाटते. सध्या व्हायरल व्हिडीओमध्ये रेल्वेस्थानकावरील सरकत्या जीन्यासमोर एक लहान मुलगा आणि दोन महिला दिसत आहे. चिमुकल्याला जीन्यावर चढण्याची भिती वाटत आहे त्याच्याबरोबर असलेल्या महिला त्याची भिती दूर करून त्याला जीन्यावर चढण्यासाठी प्रोत्साहन देण्याएवजी त्याची मज्जा घेताना दिसतात. दोघी त्याला हाताला पकडून उचलतात आणि जीन्यावर चढतात. पण जीन्यावर चढल्यानंतर दोघीही खाली बसतात आणि त्यांचा तोल जातो. दोन्ही महिला खाली पडतात पण त्या चिमुकल्याला देखील पाडतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

Aditya Thackeray and MLA Ashish Shelar
मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार; आमदार आशिष शेलार यांचा आरोप
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
Environmentalists allege that some trees were uprooted outside the Metro 3 station
‘मेट्रो ३’ स्थानकाबाहेरील काही वृक्ष उन्मळून पडल्याने पर्यावरणप्रेमींचा आरोप
Delhi Police
Delhi Police : “आज त्याला संपवूया”, कॉन्स्टेबलला गाडीखाली चिरडणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Recently trader selling scrap was robbed at gunpoint in Baramatis Lokhande Vasti area
बारामतीत पिस्तुलाच्या धाकाने व्यापाऱ्याची लूट, ग्रामीण पोलिसांकडून तिघे गजाआड
Tourism to Prosperity Nifty India Tourism Index print eco news
पर्यटनातून समृद्धीकडे…:  निफ्टी इंडिया टुरिझम इंडेक्स
stray dog ​​died man hit his on head with cricket bat in ​​Ghodbunde
ठाणे : भटक्या श्वानाचा मारहाणीत मृत्यू ,क्रिकेटच्या फळीने डोक्यात मारहाण
Mumbai, Worker died, Worker hit by car,
मुंबई : हिरे व्यापाऱ्याच्या गाडीच्या धडकेत कामगाराचा मृत्यू, सागरी किनारा रस्त्यावरील घटना

हेही वाचा – पाकिस्तानात नाश्त्याला काय खातात? Video पाहूनच अनेकांना आल्या उलट्या; असं काय आहे तुम्हीच पाहा

व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एक्सवर हा व्हिडिओ @divyakumaari नावाच्या अकाऊंटवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमधये लिहिले आहे की, अरे “हा सरकता जीना खूप धोकादायक असतो. निष्काळजीपणा करू नका, लेकराचा जीव गेला असता”

हेही वाचा – बाबो! उकळत्या तेलात घातला हात अन् चेहरा…; Video तील ते दृश्य पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एकाने कमेंट करत म्हटले, “रील बनवण्याच्या नादात जीव गेला असता.”
दुसरा म्हणाला, “रीलच्या नादात लेकराच्या जीवाची देखील काळजी घेत नाही, मूर्ख लोक”