scorecardresearch

Video : टाकाऊपासून टिकाऊ! प्लास्टिकच्या बाटलीच्या झाकणाचा ‘असा’ करा पुन्हा वापर

सोशल मिडियावरील एका व्हायरल व्हिडीओत प्लास्टिकच्या बाटलीच्या झाकणांपासून युजरने ब्रश होल्डर तयार केला आहे

Women reuse A plastic bottle cap for a brush holder
(सौजन्य:इन्स्टाग्राम/@lifeprettyhacks) Video : टाकाऊपासून टिकाऊ !प्लास्टिकच्या बाटलीच्या झाकणाचा 'असा' करा पुन्हा वापर

Viral Video : रोजच्या जीवनात आपल्याकडून प्लास्टिकचा वापर हा होतोचं. त्यात प्लास्टिकच्या बाटलीचाही समावेश होतो.घरात पाहुणे येणार असतील किंवा एखाद थंडगार पेय पिण्याची इच्छा झाली तर आपण दुकानातून कोल्ड्रिंकची बाटली आणतो. कोल्ड्रिंक्स प्यायल्यानंतर आपण प्लास्टिकची बाटली फेकून देतो. पण बरेचजण या प्लास्टिकच्या बाटल्यांचा उपयोग विविध गोष्टी बनवण्यासाठी करतात. पण तुम्ही कधी प्लास्टिकच्या बाटलीच्या झाकणाचा पुन्हा वापर केलेला पहिला आहे का ? तर आज सोशल मिडियावरील एका व्हायरल व्हिडीओत प्लास्टिकच्या बाटलीच्या झाकणाचा उपयोग ब्रश होल्डर (Brush Holder) म्हणून करण्यात आला आहे.

सुरुवातीला काही प्लास्टिकच्या बाटल्यांचे झाकण काढून बाजूला ठेवले आहेत. त्यानंतर सगळ्यात आधी एक झाकण घाली ठेवून त्याच्यावर एक पांढरा दांडा ठेवण्यात आला आहे आणि त्यावर सुद्धा एक झाकण लावलं आहे आणि बेस तयार करून घेतला आहे. त्यानंतर उरलेल्या प्लॅस्टिकच्या झाकणांचा आतील भाग काढून टाकून त्यांना मधोमध लावण्यात आलेल्या पांढऱ्या दांड्यासोबत चिटकवून घेण्यात आले आहे. आणि त्यात ब्रश ठेवून दिले आहेत. आणि अशा प्रकारे झाकणांपासून उपयोगी असे ब्रश होल्डर बनवण्यात आले आहे.

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…

हेही वाचा… गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल, दिवा स्टेशनवर रेकॉर्ड ब्रेक गर्दी! VIDEO व्हायरल…

व्हिडीओ नक्की बघा :

झाकणांपासून तयार केले ब्रश होल्डर :
अनेकदा लहान मुलांच्या शाळेच्या प्रकल्पांसाठी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू विद्यार्थ्यांना बनवून आणण्यास सांगतात. तर या कल्पनेचा वापर तुम्ही मुलांच्या प्रकल्पासाठी सुद्धा करू शकता . किंवा व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे घरच्या घरी तुम्ही दात स्वछ करणारे ब्रश ठेवण्यासाठी यांचा उपयोग करू शकता.

सोशल मिडियावर @lifeprettyhacks या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे.अनेकदा आपण प्लाटिकची बाटली आणि त्यांचे झाकण निरुपयोगी म्हणून टाकून देतो. पण व्हिडीओत या युजरने झाकणांपासून ब्रश होल्डर तयार केलं आणि टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-09-2023 at 19:14 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×