मुलाने आणली इंजिनिअर सून, सासूने सांगितलं जेवण बनवायला आणि मग…; बघा हा मजेशीर Viral Video

इंजिनिअर सुनेची स्वयंपाकाची स्टाईल पाहून सासूही थक्क होते.

daughter in law funny video
व्हायरल व्हिडीओ (फोटो: perfectly_arranged /Instagram

Viral Video: लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आजकाल सगळेच सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या या जमान्यात सध्या शॉर्ट्स व्हिडीओंची (Shorts Video) क्रेझ प्रचंड वाढली आहे. असे शॉर्ट्स व्हिडीओ तयार करण्यात सासू आणि सूनही मागे नाहीत. इंस्टाग्रामवरचा एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक सासू तिच्या सुनेसोबत स्वयंपाकघरात दिसत आहे. पण पुढच्या व्हिडीओमध्ये जे घडलं ते पाहून तुम्हाला हसू येईल.

नक्की काय झालं?

खरतर एका मुलाने इंजिनिअर मुलीशी लग्न केले आहे. लग्नानंतर मुलीचा स्वयंपाकघरात पहिला दिवस असतो. सासू सुनेला जेवण बनवायला सांगते. इंजिनिअर सुनेची स्वयंपाकाची स्टाईल पाहून सासूही थक्क होते. सून इतकी मॉडर्न निघाते की तिला एक चपातीही बनवता येत नाही. प्रथम ती तव्यावर असलेल्या चपातीला बेलण्याने भाजते. सासू तिला अडवते आणि तिला हाताने चपाती भाजायला सांगते. मग सासू तिला तव्यावरची चपाती पलटायला सांगते, मग इंजिनिअर सून तव्यावरून चपाती गॅसवर ठेवते.

(हे ही वाचा: रेल्वे रुळावर अचानक आला हत्ती आणि…; बघा Viral Video)

(हे ही वाचा: कपड्यांना आग लावून वधू-वरांनी केले धोकादायक फोटोशूट, व्हिडीओ सोशल मीडियावर Viral)

नव्या जमान्यातल्या आपल्या सुनेला पाहून सासू डोक्यावर हात मारते. स्वयंपाकघरातच देवाचं स्मरण करत ती म्हणू लागते, “अरे देवा, या मुलीचे काय होणार.” तसे, व्हिडीओमध्ये सासू आणि सून यांच्यातील प्रेमही लोकांना आवडलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Women told engineer daughter in law to make the meal watch this funny viral video ttg

Next Story
रेल्वे रुळावर अचानक आला हत्ती आणि…; बघा Viral Video
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी