scorecardresearch

‘वो स्त्री है…’ साडी नेसून महिलांनी गाजवलं फुटबॉलचं मैदान, व्हायरल Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

महिलांनी साडी नेसून फुटबॉल सामना खेळल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

womens viral video
स्त्रियांसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नसते असं म्हटलं जाते. (Photo : Twitter)

स्त्रियांसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नसते असं म्हटलं जाते. कारण आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणं आपण पाहत असतो, जिथे स्त्रियांनी कठोर परिश्रम करुन यश मिळवलेलं असतं. त्या घरं आणि ऑफिस दोन्ही ठिकाणची काम करताना तारेवरची कसरत असतात. शिवाय मुलांसह कुटुंबीयांना काय हवं नको ते बघूनअनेक कठीण परीक्षांचा अभ्यासही त्या पुर्ण करतात.

महिलांबाबतच्या अशा अनेक गोष्टी सांगता येतील. पण हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे नुकतेच ग्वाल्हेरमध्ये झालेल्या एका अनोख्या स्पर्धेचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये महिलांनी चक्क साडी नसून फुटबॉल खेळण्याचा नवा पराक्रम केला आहे. हो कदाचित हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकतं पण हे खरं आहे. जे व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल.

हेही पाहा- वयस्कर व्यक्तीच्या मदतीसाठी पोलिसांनी केलं असं काम…, व्हायरल Video पाहून तुम्हीही कौतुक कराल

हेही वाचा- ChatGPT वापरुन नव्हे, त्याबद्दलची माहिती सांगून तरुणाने ३ महिन्यात कमावले २८ लाख रुपये, कसं ते जाणून घ्या

महिलांनी साडी नेसून फुटबॉल सामना खेळल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे फुटबॉल सामने आयोजित करण्यात आले होते आणि त्याला ‘गोल इन साडी’ असं नाव देण्यात आलं होतं. व्हायरल व्हिडिओमध्ये महिलांचा एक ग्रुप रंगीबेरंगी साड्या परिधान केल्याचं दिसत आहे. शिवाय साड्यां नेसलेल्या महिला उत्कृष्ट पद्धतीने फुटबॉल खेळतानाही दिसत आहेत. जे पाहून प्रेक्षकही मोठमोठ्याने महिलांना प्रतिसाद देत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

@brajeshabpnews नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत ६ हजारांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘आमच्या स्त्रिया #Messi पेक्षा कमी आहेत का? ग्वाल्हेरमध्ये महिला साडी नेसून फुटबॉल खेळल्या.’ महिलांच्या हा कार्यक्रम ग्वाल्हेर महानगरपालिका आणि कनिष्ठ चेंबर इंटरनॅशनलच्या वरिष्ठ सदस्य संघटनेद्वारे आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेचं नाव “गोल इन साडी” असं ठेवण्यात आलं होतं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 17:41 IST

संबंधित बातम्या