scorecardresearch

Premium

कुस्तीपटूंचे आंदोलन खोटे? साक्षी मलिक, बजरंग पुनिया हसत होते? Viral फोटोचं सत्य वाचून डोळे उघडतील

Wrestlers Protest Sakshi Malik Bajrang Punia: पोलिसांच्या व्हॅनमधून जाताना विनेश फोगट, साक्षी मलिक, संगीता फोगट, बजरंग पुनिया यांच्यासह काही कुस्तीपटुंचा एक फोटो सध्या चर्चेत आहे.

Women Wrestlers Protest Is Fake Question Raised as Sakshi Malik Phogat Bajrang Punia Laughing Photo Viral Fact From Delhi
कुस्तीपटूंचे आंदोलन खोटे? साक्षी मलिक, बजरंग पुनिया हसत होते? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अंकिता देशकर

Wrestlers Protest Sakshi Malik Bajrang Punia: लाईटहाऊस जर्नालिज्मला काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात येत असल्याचे लक्षात आले. 28 मे रोजी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावेळी त्या दिशेने आंदोलनकर्ते कुस्तीपटू मोर्चासह कूच करण्याचा प्रयत्न करत होते याच दरम्यान पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. पोलिसांच्या व्हॅनमधून जाताना विनेश फोगट, साक्षी मलिक, संगीता फोगट, बजरंग पुनिया यांच्यासह काही कुस्तीपटुंचा एक फोटो सध्या चर्चेत आहे.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

काय होत आहे व्हायरल?

व्हायरल फोटो हा एका सेल्फी सारखा दिसत आहे. असे लक्षात येते की, पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेतल्यावरचा हा फोटो असावा. काही ट्विटर यूजर्सनी हे फोटो शेअर करताना हे कुस्तीपटू आनंदी असल्याचे कॅप्शन लिहिले आहे व त्यावर सडकून टीकाही केली.

तसेच दुसऱ्या फोटोमध्ये असा दावा करण्यात येत आहे की साक्षी मलिक हिला पोलिसांनी मारहाण केली आहे

तपास:

आम्ही दोन्ही फोटोंचा तपास केला.

फोटो १:

आम्ही सगळ्यात आधी व्हायरल चित्रावर गूगल रिव्हर्स इमेज सर्च चा उपयोग केला. हे फोटो आम्हाला काही न्यूज रिपोर्ट्स मध्ये आढळले.

या रिपोर्ट्स मध्ये असलेल्या फोटोमध्ये हे कुस्तीपटू हसत नव्हते.

आम्हाला The Tribune च्या ट्विटर हॅन्डल वर देखील हे फोटो सापडले.

या सगळ्या फोटोमध्ये कुठल्याच फोटोत हे कुस्तीपटू हसत नव्हते. आम्हाला बजरंग पुनियाने त्याच्या ट्विटर हँडलवर शेअर केलेले फोटोही आढळले ज्यात त्याने हे हसतानाचे फोटो खोटे असल्याचे म्हटले होते.

तपास केल्यावर आमच्या लक्षात आले की हे फोटो Faceapp च्या मदतीने बनवण्यात आले आहे. Faceapp चा प्रो व्हर्जन वापरल्यास त्यावरील वॉटरमार्क सहज काढता येतो. लाईटहाऊस जर्नालिज्म ने देखील हे चित्र एडिट करून पहिले. आम्हाला देखील ते सहज शक्य असल्याचे समजले.

फोटो २:

दुसऱ्या फोटोमध्ये दावा करण्यात येत होते कि हा फोटो साक्षी मलिकचा आहे. आम्ही या फोटोला गूगल रिव्हर्स इमेज सर्च द्वारे शोधले.

आम्हाला हा फोटो टाइम्स ऑफ इंडिया वर अपलोड केलेल्या एका आर्टिकल मध्ये दिसून आला. हा फोटो शेतकरी आंदोलनाचा असल्याचे आम्हाला समजले. हे आर्टिकल १ फेब्रुवारी, २०२१ रोजी अपलोड केल्याचे आम्हाला समजले.

आम्हाला हे फोटो विविध वेबसाईट वर देखील सापडले.

आम्हाला हे फोटो बिझनेस स्टँडर्डवरील लेखात सुद्धा दिसून आले, जे ३० जानेवारी २०२१ रोजी शेअर केले गेले होते.

कॅप्शन मध्ये लिहले होते: नवी दिल्लीतील सिंघू सीमेवर स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकरी असल्याचा दावा करणाऱ्या लोकांमध्ये झालेल्या संघर्षादरम्यान पोलिस एसएचओ (अलीपूर) प्रदीप पालीवाल यांच्यावर कथित हल्ला करणाऱ्या एका शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

आम्हाला टेलीग्राफमधील एका लेखाद्वारे कळले की हे PTI वृत्तसंस्थेचे फोटो होते.

हे ही वाचा<< “मुस्लिम मुलींना प्रेमाचं आमिष दाखवा, शरीरसंबंध… ” RSS चं हिंदू तरुणांना पत्र? व्हायरल पोस्टचं सत्य जाणून व्हाल थक्क

निष्कर्ष: कुस्तीपटूंच्या निषेधाच्या नावाने शेअर करण्यात आलेले फोटो बनावट आणि दिशाभूल करणारी असून पडताळणी न करता शेअर केले जात आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Women wrestlers protest is fake question raised as sakshi malik phogat bajrang punia laughing photo viral fact from delhi svs

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×