Viral video: लग्नसोहळा, एखादा कौटुंबिक कार्यक्रम आणि डान्स हे आता एक समीकरणच बनलं आहे. एखाद्या घरात लग्नकार्य असलं, तर खास डान्स करण्यासाठीही विशेष कार्यक्रम ठेवण्याची पद्धत आता हळूहळू सुरू होतेय. अशा कार्यक्रमांमध्ये घरातली पुरुष मंडळीच काय, महिलादेखील डान्स करण्यात आघाडीवर असतात. अशा कार्यक्रमांमध्ये संपूर्ण घर सांभाळणारी महिला जेव्हा स्वतःमधलं डान्सचं टॅलेंट दाखवते, तेव्हा ते पाहून अनेकांना तिचं कौतुकही वाटतं. अशाच एका वहिनींनी हळदीत खतरनाक डान्स केला आहे.

सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होत आहे, ज्यात एका वहिनींचा ठसकेबाज आणि दिलखुलास डान्स पाहून नेटिझन्स अक्षरशः फिदा झाले आहेत. सोशल मीडियावर डान्सचे व्हिडीओ नवीन नाहीत, पण हा व्हिडीओ काहीसा हटके आहे, कारण यामध्ये आहे ग्लॅमर आणि धमाल. आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांची पर्वा न करता या वहिनी बिनधास्त नाचत आहेत.

आजकाल सोशल मीडियावर लग्नाचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात.सध्याच्या काळात प्रत्येक लग्नात एक वेगळीच धमाल दिसून येते. नवरा- नवरी असो वा त्यांच्या कुटुंबियातील प्रत्येक सदस्य सर्व असे फुल उत्साहात असतात. यात काही मजेदार तर काही व्हिडीओ हैराण करणारे असतात. आता कधी नवरीचा डान्स तर कधी नवरदेवाचा डान्स तूफान व्हायरल होतो. असाच एक व्हडिओ सध्या व्हायरल झाला आहे. मग कधी लग्नातील डान्स करणे असो त्यात प्रत्येकजण आनंदाने सहभागी होत असतो, सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिनं भन्नाट डान्स केला आहे. मराठी गाण्यावर ठेका धरत महिलेनं कार्यक्रम गाजवला आहे. लग्नाचे असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. लग्नातील भन्नाट व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. हळद असो, मेहंदी असो, संगीत असो, किंवा मुलीला निरोप देतानाचे व्हिडीओ. असे व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडतात.

पाहा व्हिडीओ

१९९३ मध्ये ‘खलनायक’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात संजय दत्त, जॅकी श्रॉफ आणि माधुरी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या मधलं लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं ‘चोली के पीछे क्या है’ हे गाणं आजही सर्वत्र लोकप्रिय आहे. सिनेमात या गाण्यावर माधुरीने जबरदस्त डान्स केला होता. हे गाणं इला अरुण आणि अलका याग्निक यांनी गायलं होतं. या गाण्याची क्रेझ आज ३३ वर्षांनंतरही कायम आहे.