Best International Women’s Day Gifts 2026 : घड्याळाकडे न बघता दिवस-रात्र स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी जगणाऱ्या प्रत्येक मुली, आई, बहीण, बायकोसाठी जगभरात दरवर्षी ८ मार्च रोजी ‘आंतरराष्ट्रीय महिला दिवस’ साजरा केला जातो. केवळ आजचा दिवस नाही, प्रत्येक दिवस तुझाच आहे, असं त्यांना वाटावं म्हणून कधीतरी चहाचा गरम कप हातात, अगदी बिर्याणी नाही, तर साधा सोपा डाळ-भात बनवून द्यायला काय हरकत आहे? पण, काहींचा हट्ट असतो या दिवशीच काहीतरी गिफ्ट देऊन त्या प्रत्येक आई, बायको, बहीण, मुलीचा दिवस आणखीन खास करायचा. तुम्हीही अशाच विचारात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

महिला दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या भेटवस्तूंची यादी…

पत्र – तुमच्या भावना सांगणारं किंवा अगदी सगळ्याच गोष्टींसाठी धन्यवाद बोलण्यासाठी तुम्ही स्वतःच्या हातानं एक पत्र लिहू शकता.

शृंगाराच सामान – झुमके, अंगठी, बांगड्या, कुंकू, टिकली, काजळ, मेहंदी, मंगळसूत्र, नथ, जोडवी, कानातले, कंबर पट्टा, कंगवा, आरसा अशा रोज आणि सण-वाराला उपयोगी पडतील अशा छोट्या वस्तू देऊ शकता.

एखादा पदार्थ – तुमच्या हातानं बनवलेला चहा, शिरा, केक, लाडू किंवा अगदी प्रेमानं डाळ-भातसुद्धा बनवला तरी तुमची खास महिला तो अगदी आवडीनं खाईल.

फिरायला घेऊन जाणं – एखादा सिनेमा, नाटक बघायला किंवा मार्केट, मॉलमध्ये खरेदी करायला घेऊन जाणं.

साडी – आई, बायको, बहीण असो किंवा मुलगी साडी नेसणं म्हणजे त्यांचं पहिलं प्रेम असतं. त्यामुळे या खास दिवशी साडी गिफ्ट करणं उत्तम ठरेल.

चॉकलेट, पेस्ट्री किंवा अगदी केकसुद्धा तुमच्या आवडत्या स्त्रीच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. त्याव्यतिरिक्त हेअर स्ट्रेटनर, ड्रायर, कर्ल्स, ओव्हन, चहाची किटली, ट्रे आदी अनेक उपयोगी वस्तू तुम्ही देऊ शकता.

google trends gift ideas

महिलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासाठी त्यांना कोणत्याही आलिशान वस्तू देण्याची गरज नसते. अगदी चाफा, गजरा, फूल आणून दिलंत तरीही त्यांच्या डोळ्यांत लगेच आनंदाश्रू दाटून येतील आणि चेहऱ्यावर हास्याची कळी फुलल्याचे दिसेल. स्वातंत्र्य, नोकरी किंवा अगदी आवडीचा व्यवसाय करण्यासाठी परवानगी मागण्याची गरज भासता कामा नये. अशा त्यांच्या अगदी छोट्या छोट्या अपेक्षा असतात. तेव्हा भेटवस्तू देण्याव्यतिरिक्त तुम्ही या त्यांच्या अपेक्षांपैकी एखादी गोष्ट जरी तुम्ही पूर्ण केलीत ना तरी तुमच्या त्या आवडीच्या स्त्रीला नक्कीच भरून पावल्याचे समाधान लाभेल.