Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ भावूक करणारे असतात तर काही व्हिडीओ खूप काही शिकवणारे असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतात तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतात, काही लोक त्यांच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टी कॅमेऱ्यात कैद करतात.

सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये भर रस्त्यावर एक वेड्यासारखा दिसणारा माणूस काही महिलांना रस्ता ओलांडण्यास मदत करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याविषयी अद्याप माहिती नाही पण सध्या सोशल मीडिया चांगलाच चर्चेत आला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक रस्ता दिसेल. या रस्त्यावर वाहने ये जा करताना दिसत आहे. वेड्यासारखी दिसणारा हा माणूस रस्त्याच्या मध्ये उभा आहे. त्यानंतर तो झेब्रा क्रॉसिंगवर उभा राहतो आणि वाहनाला थांबण्यास सांगतो, जेणेकरून दोन महिलांना रस्ता ओलांडता येईल. या दोन महिलांपैकी एका महिलेच्या कडेवर एक छोटे बाळ सुद्धा आहे. त्यानंतर वाहनांची गर्दी कमी झालेली पाहून तो त्या दोघींना रस्ता ओलांडण्यास मदत करतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. हा माणूस खरंच वेडा आहे की माहीत नाही पण त्याचे केस वाढलेले आहे आणि अंगात मळलेले कपडे घातले आहे. त्याचा लूक एखाद्या वेड्या माणसासारखा वाटतो. या व्हिडीओवर लिहिलेय, “सगळे ज्याला वेडे समजत होते, तो एकटाच शहाणा निघाला.”

हेही वाचा : रक्षाबंधनासाठी निघालेल्या ताईने बसमध्येच दिला आपल्या लेकराला जन्म; महिला कंडक्टर अन् नर्सने केली ‘अशी’ मदत

पाहा व्हायरल व्हिडीओ

pimpalkaranand या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ज्याला सगळे जग वेडा समजत होते तोच खरा शहाणा निघाला.. व्हिडिओ पाहून अंतर्मुखही व्हाल आणि डोळ्यांत पाणीही येईल…”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ज्याला सगळं जग वेडा समजत होतं तोच खरा शहाणा निघाला.. व्हिडिओकॉन अंतर्मुखही व्हाल आणि डोळ्यात पाणीही येईल… कमेंट करा तुम्हाला काय वाटलं जरूर सांगा.”

एक युजर लिहितो, “दिसतं तस नसतं, आपण माणसं ओळखयला चुकतो” तर एका युजरने लिहिलेय, “माणूस कधीच वाईट नसतो…त्याची वेळ आणि परिस्थिती वाईट असते…” आणखी एका युजरने लिहिलेय, “तुम्हाला मुंबईतच असे लोक पाहायला मिळतील.” अनेक युजर्स हा व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.