क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ आहे असं म्हटलं जातं. तसेच हा खेळ केवळ खेळ भावनेने खेळला जावा यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद कायमच प्रयत्नशील असते. मात्र भारत पाकिस्तानसारख्या सामन्यांमध्ये अनेकदा काही मर्यादा ओलांडून दोन्ही संघांचे चाहते एकमेकांवर टिका टिप्पणी करतात. अनेकदा चाहते क्रिकेटच्या मैदानाकडे युद्धभूमी म्हणूनच बघतात आणि त्यांच्यात सोशल नेटवर्किंगवर शाब्दिक बाचाबाची होते. पण मँचेस्टरमध्ये झालेल्या भारत पाकिस्तान सामना बघण्यासाठी आलेल्या एका जोडप्याने केलेल्या कृतीमुळे दोन्ही देशांतील चहाते त्यांचे कौतुक करताना चित्र सध्या दिसत आहे.

ट्विटवर लक्ष्मी कौल यांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये एका जोडपे अनोख्या पोषाखामध्ये दिसत आहे. या जोडप्याने भारत आणि पाकिस्तान संघाच्या जर्सी अर्ध्या अर्ध्या कापून त्या एकत्र शिवून घातल्या होत्या. त्यामुळे त्या दोघांकडे आपसूकच लक्ष्य वेधले जात होते. लक्ष्मी यांनी आपल्या ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार हे जोडपे कॅनडाचे आहे. पती पाकिस्तानी असून पत्नी भारतीय आहे. त्यामुळे त्यांनी सामन्याला येताना अशाप्रकारे दोन्ही संघांच्या जर्सी दोघांना घालता याव्या म्हणून भन्नाट कल्पना वापरून ही आगळी वेगळी जर्सी तयार करुन ती घालून सामन्याला उपस्थिती लावली. हे दोघे मैदानाबाहेर आले तेव्हा अनेकांनी त्यांच्याबरोबर फोटो क्लिक करत याचा खऱ्या अर्थाने खेळाडू वृत्ती म्हणतात असं म्हटलं आहे.

सामन्याआधी एका वृत्तवाहिनीशी बोलताना या दोघांनी आमचा क्रिकेटला पाठिंबा असल्याचे सांगितले. ‘आम्ही दोन्ही देशांचे पाठिराखे आहोत. मुळात आमचा पाठिंबा क्रिकेटला आहे. दोन्ही संघांपैकी जो चांगला खेळ करेल तो दो संघ जिंकेल. दोन्ही देशांमधील शांततेचा विजय व्हावा असं आम्हाला वाटतं’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

ट्विटवरही अनेकांनी या दोघांना त्यांच्या या भन्नाट कल्पनेसाठी शुभेच्छा देत क्रिकेट चाहते म्हणून तुमचा अभिमान वाटत असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी त्यांची मस्करी केली आहे. पाहुयात काय म्हणतायत ट्विपल्स या जोडप्याबद्दल

१)
आपण सानिया शोएबच्या पुढे जायला हवं

२)
मध्ये इंग्लंडच्या झेंड्याची पट्टी लावा

३)

स्पीरीट ऑफ गेम

४)

माणूसकीने जोडलेले

५)
असं असेल तर अर्ध अर्ध चालेल

६)

सामन्याचा आनंद घ्या

७)

जगाला अशा लोकांची गरज आहे

दरम्यान, विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धाच्या विजयाची मालिका भारताने रविवारीही कायम राखली. रोहित शर्माच्या दमदार शतकी खेळीनंतर कुलदीप यादव, हार्दिक पंड्या आणि विजय शंकर यांनी गोलंदाजीत चमक दाखवल्यामुळे भारताने मँचेस्टरमध्ये ‘विजयासप्तमी’ साजरी केली. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला डकवर्थ-लुइस पद्धतीनुसार ८९ धावांनी हरवले.