जगभरात आज ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा होत आहे. पर्यावरण दिनानिमित्त अनेक जागरुक नागरिक आपल्या परिसरातील स्वच्छता करतात. तर काहीजण या दिनानिमित्त आवर्जून एखादी स्वच्छता मोहीम राबतात. अशीच स्वच्छता मोहीम आयआयटी बॉम्बेच्या अभ्युदय टीमने राबवली होती. या मोहीमेअंतर्गत त्यांनी पवई तलावाची साफसफाई केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘स्वच्छ पर्यावरण, हरित पर्यावरण’ हा संदेश देत, आयआयटी-बॉम्बेच्या अभ्युदय टीमने रविवारी (ता.४) पवई तलावात स्वच्छता मोहीम राबवली. राज्यभरात ५ जूनपासून सुरू होणाऱ्या संपूर्ण पर्यावरण सप्ताहात विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. आयआयटी बॉम्बेच्या अभ्युदय टीमच्या सुमारे ४०० स्वयंसेवकांनी २ किमी लांबीच्या तलावाच्या परिसरात स्वच्छता करून तीन टन कचरा साफ केला.

स्वयंसेवकांनी गोळा केलेला कचरा.

हेही पाहा- वटपौर्णिमेच्या पूजेवेळी वडाच्या झाडाने घेतला पेट; थरारक Video व्हायरल, झाड जळत असतानाही महिला…

तलावाची स्वच्छता करताना अभ्युदय टीमचे स्वयंसेवक.

“स्वच्छ, हिरवेगार आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी तलावाच्या किनार्‍याची स्वच्छता करण्याच्या उद्दिष्ट असून आयआयटी बॉम्बेच्या सर्वात सुंदर परिसरांपैकी एक असलेल्या तलावाची काळजी घेणे ही आमची जबाबदारी आहे,” असे टीम अभ्युदयने सांगितले. या प्रयत्नांना स्थानिक रहिवासी आणि आयआयटी प्राध्यापकांनी स्वच्छता मोहिमेत भाग घेऊन पाठिंबा दिला. तर अनेकांनी अभ्युदय टीमच्या स्वच्छता मोहीमेचे कौतुक देखील केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World environment day 2023 iitb abhyudaya team cleans 3 tonnes of garbage from powai lake jap
First published on: 05-06-2023 at 10:38 IST