मागच्या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये माली देशातील एका महिलेने एकावेळी ९ बाळांना जन्म दिल्याची बातमी तुम्ही ऐकली, वाचली असेल. या महिलेचे नाव हलिमा सिस्से असून, आता बाळांना सुखरूप घरी नेण्यात आल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे देण्यात आली आहे. डिलीव्हरी आणि त्यानंतरच्या सर्व औषधोपचारासाठी हरिमा मोरोक्कोमध्ये वास्तव्यास होत्या.
या नऊ बाळांचा सिझेरियन डिलीव्हरीने जन्म झाला. यामध्ये ५ मुली आणि ४ मुलं असून, त्यांचे आरोग्य उत्तम असल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये देण्यात आली. एकाच वेळी जन्माला आलेल्या या ९ बाळांची नोंद गिनीज बूकमध्ये करण्यात आली होती.
आणखी वाचा: Video: स्कूटर पार्क करतानाचा हा व्हिडीओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच
एक वर्षाहून अधिक कालावधीच्या उपचारांनंतर ही बाळं मायदेशी म्हणजेच मालीला परतली आहेत. देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी या ९ बाळांचे आणि त्यांच्या पालकांचे स्वागत केले. एकाच वेळी जन्माला आलेल्या या बाळांची नावे गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. याआधी ८ बाळांचा एकावेळी जन्म झाल्याची नोंद होती.