बिअरचे नाव ऐकून डोक्यात एकच गोष्ट येते ती म्हणजे सोलिब्रेशन, पार्टी. लोक नेहमी आनंदाचे क्षण बिअर पिऊन सेलिब्रेट करतात. उन्हाळ्याचे दिवस आणि चिल्ड बिअर हे समीकरण बऱ्याच जणांचं आवडतं असतं. मित्रांचं रियुनियन असो वा एखादी पार्टी, या सगळ्याला बिअर आणखीच रंगत आणते. तर काही लोक निरोगी राहण्यासाठी बिअर पितात. अल्कोहलिक पेय पदार्थांमध्ये बियर जास्त वापरलं जाणारं पेय आहे. यात अल्कोहलची मात्रा इतर प्रकारच्या दारूंपेक्षा कमी असते. अनेकांचे बियर हे फेव्हरेट ड्रिंक आहे. यामुळे अनेक जण इतर पेयांपेक्षा बियरचे सेवन करतात. हीच बिअर तुम्ही कधी घरी बनवली आहे का? नाही ना. दरम्यान 2 मिनिटात मॅगी बनते हे तुम्ही एकलं असेल पण २ मनिटात आता बिअर बनवा असं कुणी सांगितलं तर ? सध्या याच घरच्या घरी २ मिनिटात बनणाऱ्या बिअरची चर्चा सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगातील सर्वात पहिली बिअर पावडर –

आतापर्यंत तुम्ही बिअर ही बिअर शॉपधूनच आणली असेल. बऱ्याच वेळा आपण विकेंडला फिरायला जातो आणि प्रवासात शॉपमधून आणलेली बिअर थंड राहत नाही, त्यामुळे बिअर पिण्याची मजा जाते, मात्र आता असं होणार नाहीये. कारण, जर्मनीतील एका ब्रँडनं चक्क बिअरची पावडर तयार केली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार दोन मिनिटांत तयार होणारी ही जगातील सर्वात पहिली बिअर पावडर आहे. जर्मन मॉनेस्च्री बेस्ड कंपनीकडून ही पावडर तयार करण्यात आली आहे. या बिअरमध्ये अल्कहोल नसणार आहे. मात्र येत्या काळात अल्कोहोलसहित बिअर पावडर बाजारात आणण्याचा या कंपनीचा मानस आहे.

हेही वाचा – …तर ट्विटरच्या सर्व व्हेरिफाइड अकाउंट्सच्या ब्लू टीक जाणार! एलॉन मस्क यांचा इशारा

पावडरपासून तयार झालेल्या बिअरचा फायदा –

या पावडरपासून तयार झालेल्या बिअरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आशिया आणि आफ्रिका खंडात वाहतुकीचा खर्च प्रमाणापेक्षा अधिक आहे. तिथल्या लोकांना याचा फायदा अधिक होणार आहे. दरम्यान ही बिअर पावडर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली नाही. लवकरच ती विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worlds first beer powder new instant in market by a german company latest marathi new srk
First published on: 24-03-2023 at 13:08 IST