Big Jackfruit Viral Video : फणस ही एक अशी भाजी आहे, जी अनेकदा शाकाहारी लोकांना हुबेहूब मांसाहारी (Non-Veg) जेवणाची चव देते, म्हणूनच चमचमित खाणाऱ्यांच्या घरात हौशीने अर्धा किंवा एक किलो फणस आणला जातो. पण, सोशल मीडियावर सध्या अशा एका फणसाचा व्हिडीओ व्हायरल होतोय जो पाहून तुम्हीही चकित व्हाल.
एका फणसाचं वजन जास्तीत जास्त किती असू शकतं? ५ किलो, १० किलो किंवा फार फार तर १५ किलो… पण, सध्या सोशल मीडियावर एका अशा महाकाय फणसाचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्याचं वजन ऐकून तुमचेही डोळे चक्रावतील. तब्बल ४८ किलो वजनाचा हा अवाढव्य फणस पाहून लोक थक्क झाले आहेत.
फणस उचलताना आले नाकी नऊ
व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, एक माणूस खूप ताकदीने फणस उचलताना दिसतोय, तो कसाबसा फणस उचलून वजनकाट्यावर ठेवतो, तो वजनाला इतका भारी आहे की उचलताना त्या माणसाच्या नाकी नऊ आले.
व्हिडीओमध्ये एक माणूस मोठ्या कष्टाने फणस उचलताना दिसतो. कसाबसा तो फणस वजनकाट्यावर ठेवतो. वजन काट्यावर ठेवताच फणसाचे वजन ४८.६४० किलो इतके दिसतेय. फणस इतका मोठा आहे की ३ डझनभर लोकं तो खाऊ शकतात. (Largest Jackfruit Viral Video}
जगातील सर्वात मोठा फणस अमेरिकेतील फ्लोरिडा येथे सापडला होता, त्याचे वजन अंदाजे ५५ किलोग्रॅम होते. ५४.४३ किलोग्रॅम (११९ पाउंड १६ औंस) वजनाच्या या फणसाला ऑगस्ट २०२४ मध्ये प्रमाणित करण्यात आले होते.
सर्वात मोठ्या फणसाचा व्हिडीओ व्हायरल ( Big Jackfruit 48 KG Video Viral)
दरम्यान, आता व्हायरल होणाऱ्या या मोठ्या फणसाचा व्हिडीओ पाहून युजर्सही चकित झाले आहेत. अनेक युजर्स त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने त्याला ‘सर्व फळांचा राजा’ म्हटले आहे, तर दुसऱ्याने त्याला ‘महाकाय फळ’ असेही म्हटले आहे. एका युजरला तर या फणसाला पाहून स्वतःचे वजन आठवले. त्याचे वजन ४७ किलोग्रॅम आहे. काहींनी हा व्हिडीओ एआय जनरेटेड आहे असे म्हटले आहे.
