Woman Dance Video Viral : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. यात हल्ली डान्स व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. डान्स ही अशी कला आहे जी व्यक्तीला आनंद, उत्साह देते; त्यामुळे अनेक हौशी लोकं संधी मिळेल तिथे मन भरून नाचून घेतात. यात सोसायटीतील पूजा म्हणजे अशा हौशी डान्सर्ससाठी हक्काचे व्यासपीठ असते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका सोसायटीतील सत्यनारायण पूजेच्या कार्यक्रमातील डान्स व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक ताई स्टेजवर जबरदस्त डान्स करताना दिसतेय. ताईंचा हा डान्स सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

व्हिडीओत एक ताई झुमका गिरा रे या गाण्यावर कमाल डान्स करताना दिसतेय. तिच्या या जबरदस्त डान्स व्हिडीओने आता सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. विशेष म्हणजे ही ताई चक्क साडी नेसून हा भन्नाट डान्स करतेय.

ताईचा ‘झुमका गिरा रे’वर जबरदस्त डान्स

व्हिडीओत पाहू शकता, सोसायटीतील सत्यनारायण पूजेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केलं होतं. याच कार्यक्रमात अनेक लहान मुली सहभागी झालेल्या दिसतायत. याचवेळी एक ताईदेखील ‘झुमका गिरा रे’ गाण्यावर अगदी उत्साहाने नाचू लागते. साडी नेसूनही ती प्रत्येक स्टेप एकदम परफेक्ट करतेय. ती फक्त नाचतच नाही तर नाचताना चेहऱ्यावरही अगदी जबरदस्त एक्स्प्रेशन देतेय, त्यामुळे तिचा हा डान्स पाहून उपस्थितही चकित झाले.

ताईचे डान्स करतानाचे हास्य, तिचे हावभाव आणि तिची देहबोली पाहून उपस्थितही आनंदाने ओरडून, शिट्ट्या वाजवून, टाळ्या वाजवत प्रोत्साहन देऊ लागले. प्रत्येकजण तिच्या परफॉर्मन्सची मनापासून प्रशंसा करत होता. इतकचं नाही तर ताईने डान्स करता करता प्रेक्षकांनाही आपल्याबरोबर नाचायला भाग पाडले, या व्हिडीओला आता सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळतोय.

अनेक युजर्सनी तिची प्रशंसा करत म्हटले की, ताईने डान्समध्ये अनेक सेलिब्रिटींनाही मागे टाकले. काहींनी तिची एनर्जी आणि आत्मविश्वास प्रेरणादायी असल्याचे म्हटले. ताईचा हा डान्स व्हिडीओ @swamiaai__pathak नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. यावर एका युजरने लिहिले की, चांगली नाचली ताई, दुसऱ्याने लिहिले की, एक्स्प्रेशन मस्त आहे. तिसऱ्याने लिहिले की, अश्लीलता न पसरवता आणि तोकडे कपडे न घालताही डान्स कार्यक्रम चांगला साजरा करता येतो हे या व्हिडीओने सिद्ध केले.