अंकिता देशकर

Wrestler Sakshi Malik Farmers Protest Tweet: भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आंदोलनाला उतरलेल्या साक्षी मलिकने अलीकडेच शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुद्धा पाठिंबा दर्शवला आहे. साक्षी मलिकने ट्वीटद्वारे सांगितले की, “सूर्यफूल पिकासाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर हरियाणा पोलिसांनी शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा करून लाठीचार्ज केला. काही शेतकरी नेत्यांनाही अटक करण्यात आली आहे. यामध्ये शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गुरनाम चरुनी यांनाही अटक झाली आहे.” या आंदोलनकर्त्यांना लवकरात लवकर सोडण्याचे आवाहन सुद्धा साक्षीने केलेले आहे. पण या ट्वीटमध्ये साक्षीने शेअर केलेल्या फोटोची एक वेगळीच कहाणी सध्या समोर येत आहे.

Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा
Kangana Ranut and surpiya
काँग्रेसच्या महिला नेत्याने पोस्ट केलेल्या कंगनाच्या ‘त्या’ फोटोवरून वादंग; अभिनेत्री म्हणाली, “वेश्याव्यवसाय करणाऱ्या…”
arvind kejriwal
लालकिल्ला: सहानुभूतीच्या लाटेवर केजरीवाल?
Stray Dog
भटक्या कुत्र्यांना मांस खाऊ घालणे महिलेला पडलं महागात, धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा दाखल

काय होत आहे व्हायरल?

कुस्तीपटू साक्षी मलिक ने व्हायरल चित्र आपल्या ट्विटर प्रोफाइल वर शेअर केले.

तिने लिहिले की: शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांसाठी फक्त एमएसपी मागितला. पण क्रूर यंत्रणेने त्यांना लाठीमार आणि अटक केली. शेतकरी नेते गुरनाम सिंग चधुनी यांच्या अटकेचा आम्ही निषेध करतो, त्यांची लवकर सुटका करण्यात यावी. आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्याच्या बातमीने डोळ्यात पाणी आले.

बाकी यूजर्स देखील हा दावा शेअर आणि रिट्विट करत आहेत.

तपास:

आम्ही प्रत्येक चित्रावर गूगल रिव्हर्स इमेज सर्चचा वापर करून सगळे फोटो शोधण्यास सुरुवात केली.

फोटो १:

आम्ही पहिल्या फोटोवर रिव्हर्स इमेज सर्च सुरू केला. आम्हाला विविध रिझल्ट दिसून आले. आम्हाला हे फोटो न्यूज नेशनच्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या बातमीत सापडले.

https://www.newsnationtv.com/photos/news/police-beaten-auto-driverdelhi-police-mukherjee-nagar-rickshaw-driver-sardar-auto-driver-sardar-police-beaten-1680.html

हे आर्टिकल १७ जून २०१९ रोजी अपलोड करण्यात आले होते. या बातमीत दिल्ली पोलिसांनी एका ऑटो चालकाला आणि त्याच्या मुलाला मारहाण केल्याचे म्हटले होते. आम्हाला हा फोटो एका ट्वीटमध्ये देखील आढळून आला .

आम्हाला हा फोटो एका फेसबुक पेजच्या पोस्ट मध्ये देखील दिसून आला, हरियाणा टाइम्सने हा फोटो १७ जून, २०१९ ला पोस्ट केला होता

फोटो २:

मनदीप पुनिया या पत्रकाराने केलेल्या ट्विटमध्ये आम्हाला दुसरा फोटो आढळून आला. यात या व्यक्तीचे नाव रविंदर असल्याचे सांगण्यात आले होते, ज्याला पोलिसांनी मारहाण केल्यानंतर त्याला ७ सेमी लांब जखम झाली आहे.

आम्हाला या व्यक्तीचा फोटो एका फेसबुक पोस्ट मध्ये देखील दिसून आला.

हा फोटो २९ ऑगस्ट, २०२१ रोजी पोस्ट करण्यात आला होता.

फोटो ३:

तिसरा फोटो आता झालेल्या शेतकरी आंदोलनाचे असल्याचे सांगूनच शेअर करण्यात येत होता.

या चित्रांचा कोलाज आम्हाला western.jat या इंस्टाग्राम यूजर ने केलेल्या पोस्ट मध्ये सापडले.

हे ही वाचा<< ओडिशा रेल्वे अपघात टाळण्यासाठी ५३ वर्षीय अपंग माणूस सहा किलोमीटर धावला? कौतुक केल्यावर कळलं की खरं त्याने…

निष्कर्ष: हरियाणातील शेतकऱ्यांवर नुकत्याच झालेल्या लाठीचार्जशी संबंध जोडणारे जुने फोटो व्हायरल होत आहेत. साक्षी मलिकने पोस्ट केलेला फोटो सुद्धा जुना आहे.