Viral Video: लॉकडाऊन पासून सोशल मीडियावर शॉर्ट व्हिडीओ (रील) पोस्ट करून प्रसिद्धी मिळवणे हा प्रयत्न अनेकांचा असतो. या हव्यासापोटी ते कोणाचाही छळ करण्यास मागे-पुढे बघत नाहीत. कधी प्राण्यांचा, कधी स्वतःचा तर कधी इतरांचा जीव देखील ते धोक्यात टाकायला अजिबात घाबरत नाही. मग, असे व्हिडीओ व्हायरल झाल्यावर संबंधितावर गुन्हे दाखल केले जातात. तर आज व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत असंच काहीस पाहायला मिळालं आहे. एक तरुण रील्ससाठी धोकादायक स्टंट करताना दिसून आला आहे.

व्हायरल व्हिडीओ कुठला आहे याची अद्याप माहिती कळू शकलेली नाही. पण, दृश्य एखाद्या शेतातील आहे असे दिसून येत आहे. एक ट्रॅक्टर रस्त्यावर उभा आहे, तर या ट्रॅक्टरला पाहून तेथे उपस्थित तरुणाला एक रील बनवण्याची कल्पना सुचते. हा तरुण रील बनवण्यासाठी ट्रॅक्टरच्या भल्या-मोठ्या चाकाला पकडून बसतो. तसेच तो एवढ्यावरच थांबत नाही. तरुण ट्रॅक्टरचालकास ट्रॅक्टर सुरू करण्यास सांगतो आणि गिरकीप्रमाणे गोल-गोल फिरू लागतो. ट्रॅक्टरच्या मदतीने रील बनवणाऱ्या तरुणाचा हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…माणुसकी जपणारा माणूस…! दिवस-रात्र राबणाऱ्या वाहतूक पोलिसाला ‘त्याने’ दिले गिफ्ट; VIDEO तील हृदयस्पर्शी हावभाव जिंकतील तुमचेही मन

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, तरुण रील शूट करण्यासाठी ट्रॅक्टरची मदत घेतो आहे. तसेच तो स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ट्रॅक्टरच्या चाकाला पकडून बसला आहे. तसेच त्याने इथपर्यंत न थांबता ट्रॅक्टरचालकास ट्रॅक्टर सुरू करायला सांगितले आणि जसं चाक फिरेल तसं हा सुद्धा गोल-गोल गिरक्या घेताना दिसून आला आहे. तसेच तरुणाचा अज्ञात मित्र बहुधा हा रील त्याच्या मोबाइलमध्ये शूट करून घेत आहे. ट्रॅक्टरचालक किंवा तरुणाचा रील शूट करणाऱ्या व्यक्तीने त्याला असं करण्यापासून थांबवलेसुद्धा नाही; जे पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @PalsSkit एक्स (ट्विटर) या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आले आहेत. अनेक जण तरुणाला खतरों के खिलाडी म्हणताना, तर बरेच जण त्याच्या या बेजबाबदार स्टंटवर संताप व्यक्त करताना दिसून आले आहेत. असे रील शूट करण्याआधी आपल्यातील प्रत्येकाने आपण स्वतःच्या जीवाशी छळ तर करत नाही आहोत ना याचा एकदा तरी विचार केला पाहिजे.