सोशल मीडिया हे केवळ माणसांसाठीच नाही तर प्राण्यांसाठीही असे व्यासपीठ बनत आहे, जिथे त्यांना झपाट्याने लोकप्रियता मिळत आहे. दररोज काही प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल (Viral Video)होतात. असाच एक कांगारूंचा एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन लढवय्यांप्रमाणे आपापसात लढताना दिसत आहेत. त्याची ही झुंज सोशल मीडियावर खूप पाहिली आणि शेअर केली जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय प्राण्यांची ही झुंज बघून नेटीझन्स आपली प्रतिक्रियाही देत आहे.

टेक्सासमधील सॅन अँटोनियो प्राणीसंग्रहालयाचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये हे कांगारू एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. प्राणीसंग्रहालयाचे अध्यक्ष आणि सीईओ टिम मॉरो यांनी व्हिडीओ शेअर केला आणि लिहिले, ‘कोणाला पाहिजे? MMA (मार्सुपियल मार्शल आर्ट्स).’ मार्सुपियल हा मार्शल आर्ट प्रकार आहे, ज्यामध्ये दोन सैनिक हात वापरून लढतात. ३१ सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन कांगारू एकमेकांशी भांडताना दिसत आहेत आणि तिथे उपस्थित असलेले इतर लोक त्यांना पाहून मजा घेत आहेत. व्हिडीओच्या शेवटी एक कांगारू धावताना दिसत आहे तर दुसरा त्याच्या मागे जात आहे.

(हे ही वाचा: “मला माझ्या वडिलांचे स्वागत करण्यासाठी…” पितृदिनी आनंद महिंद्रानी शेअर केली भावनिक पोस्ट)

(हे ही वाचा: Optical Illusion: पानात लपली आहे मगर, तुम्ही शोधू शकता का?)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने ट्रेंड होत आहे आणि आतापर्यंत २००० हून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. अनेकांनी यावर कमेंट्सही केल्या आहेत. कांगारूंची शेपटी खूप मजबूत असते आणि ते त्यांचे संपूर्ण भार त्यांच्या शेपटीवर वाहून नेऊ शकतात. या व्हिडीओमध्ये हे कांगारू आपल्या शेपटीने संपूर्ण शरीराचा समतोल साधत असल्याचेही तुम्ही पाहू शकता.