पुणे तिथे काय उणे हे उगाच म्हणत नाही. पुणेकर कधी काय करतील याचा काही नेम नाही. असाच एका पुणेरी तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हाला धक्का बसू शकतो. व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण पावसाचा लुटताना दिसत आहे पण ज्या पद्धतीने तो पावसाच्या पाण्यात खेळत आहे ते पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

पावसाच्या पाण्यात भिजण्याचा मोह सर्वांनाच होतो. तुम्ही अनेकदा लहान मुलांना धो धो कोसळणाऱ्या पावसात भिजताना पाहिले असेल. कोणी रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यात कागदाची होडी करून सोडातात. सध्या पावसाचा आनंद लुटणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा तरुण भररस्त्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यामध्ये खेळताना दिसत आहे.

हेही वाचा –“जय शिवराय!”, हिरव्यागार शेतात साकारली शिवबाची प्रतिमा; शेतकऱ्याचा छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा

व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. पुण्याच्या येरवडा परिसरातील हा व्हिडीओ आहे. व्हिडीओमध्ये एक तरुण रस्त्यावरील पाण्यावर तरंगणाऱ्या पांढऱ्या जाड मॅटवर झोपलेला दिसत आहे. वाहत्या पाण्यासह मॅटही वाहत जात आहे त्यावर तरुण आरामात झोपलेला दिसत आहे. हे दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. तरुण हाताने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहणांना बाजूला होण्याचा इशारा करत आहे. पावसाचा आनंद लुटणारे अनेक लोक पाहिले असतील पण अशा पद्धतीने पावसाचा आनंद लुटणारा व्यक्ती पहिल्यांदाचा पाहिला असेल.

व्हिडीओ mipunekar.in नावाच्या इंस्टापेजवर पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “कशी वाटली भावाची शक्कल?”

हेही वाचा –‘पंचायत’ वेबसिरीजमधील प्रसिद्ध फुलेरा गाव पाहिले का? Viral Video पाहून चाहते झाले खूश, म्हणाले, “रस्ता….”

लोकांना व्हिडीओ आवडला असून त्यावर अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहे. एकाने लिहिले, “जाशील येरवडा जेलमध्ये थेट”

दुसरा म्हणाला,”मन जिंकलस भावा, डोळ्याचं पारणं फिटलं रे”

तिसरा म्हणाला,”भावा जरा सांभाळून, तसाच गटारमध्ये जाशील”