Young Boy Success Life Rules : लहान मुलं कधी काय करतील काही सांगता येत नाही, अनेकदा ते असे काही अतरंगी काम करतात की पाहून हसू आवरणं अवघड होतं. अभ्यासाबरोबर अनेकदा ते वेगवेगळ्या उचापती करत असतात. अनेक मुलांना वेगवेगळे छंद असतात. काहींना वेगवेगळ्या गोष्टी लिहून ठेवायला आवडतात. काही मुलं स्वत:साठी काही नियम तयार करतात जे ते रोज फॉलो करतात. अशाचप्रकारे एका लहान मुलाने आयुष्यात यशस्वी होण्यासाठी स्वत:साठी काही नियम तयार केले आहेत, जे नियम तो रोज फॉलो करतो. पण, हे नियम वाचून त्याच्या घरच्यांना फार हसायला आले. हे नियम काय आहेत जाणून घेऊ…
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता, एका वहीच्या पानावर एका मुलाने आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काही नियम लिहिले आहेत. जे त्याची बहीण वाचून दाखवतेय, समोर त्यांची आई बसलीय. यातील एका नियमामुळे व्हिडीओ व्हायरल होतोय. तो नियम म्हणजे, घरातील तणावापासून दूर राहा, हा नियम बहीण वाचून दाखवताच त्याची आई प्रतिक्रिया देते की, सकाळी उठवल्यावरच तुला तणाव जाणवेल, झोपा काढणाऱ्या व्यक्तीला कसा काय तणाव जाणवू शकतो? यावेळी तो मुलगा त्याच गोष्टीला ‘तणाव’ म्हणतो. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ @ImMemesupplier नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, १०० टक्के बरोबर गोष्ट.” अनेकांनी हा खरंच हास्यास्पद व्हिडीओ असल्याचे म्हटले आहे, तर अनेकांनी भावाचा तणाव भारीच आहे असे म्हटले आहे.
