बापरे! एक शिंक आली अन् मृत्यूनं गाठलं, मित्रांसोबत गप्पा मारताना नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा Viral Video पाहा | Loksatta

बापरे! एक शिंक आली अन् मृत्यूनं गाठलं, मित्रांसोबत गप्पा मारताना नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा Viral Video पाहा

मित्रांसोबत गप्पा मारत असताना अचानक एका तरुणाला शिंक आली, त्यानंतर घडला धक्कादायक प्रकार….

बापरे! एक शिंक आली अन् मृत्यूनं गाठलं, मित्रांसोबत गप्पा मारताना नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा Viral Video पाहा
रस्त्यावरून जात असताना अचानक एका तरुणाचा मृत्यू झाला. (image-social media)

माणसाचा मृत्यू अटळ आहे पण तो असा अचानक आला, तर आयुष्याच्या सोनेरी वाट मृत्यूच्या दारात जाऊन संपते. जगात अनेक प्रकारच्या विचित्र घटना घडतात. आपल्या समोरच भयानक घटना घडतात, असं नाही. परंतु, थरकाप उडवणाऱ्या काही घटना घडतात आणि त्या सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर येतात. अशाच एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. कारण चालता बोलता एका तरुणाला मृत्यू आल्याची घटना घडल्याचा थरार एका कॅमेरात कैद झाला आहे. मित्रांसोबत गप्पा मारत रस्त्यावरून जात असताना शिंक आली अन् तरुण खाली कोसळला. पण शिंक आल्याने या तरुणाचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

तरुणाला शिंक आली, त्यानंतर काय घडलं?

जीममध्ये व्यायाम करताना, मैदानात खेळताना, डान्स करतना हृदयविकाराच्या झटक्याने लोकांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पण शिंक आल्यानंतर एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो, अशा घटनांबाबत क्वचितच आपण ऐकलं असेल. मात्र, उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये अशीच एक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. एक तरुण त्याच्या मित्रांसोबत रस्त्यावरून जात असताना गप्पा मारत असतो. त्यावेळी त्याला अचानक शिंक येते आणि तो रस्त्यावर कोसळतो. अचानक आपल्या मित्राला काय झालं? असा प्रश्न त्या मुलांना पडतो. त्यानंतर त्या तरुणाला त्याचे मित्र रुग्णालयात घेऊन जातात. पण डॉक्टर तरुणाला मृत घोषीत करतात.

नक्की वाचा – “Mother Of The Year”: रॅकून प्राण्याचा मुलीवर हल्ला, लेकीला वाचवण्यासाठी आईने असं काही केलं…; 15 million व्यूज मिळालेला Viral Video पाहतच राहाल

इथे पाहा व्हिडीओ

व्हिडीओ होतोय व्हायरल

रस्त्यावर खाली कोसळलेल्या तरुणाचा मृत्यू शिंक आल्याने झाला. शिंक आल्याने त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे या तरुणाचा मृत्यू झाला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. तरुणाचा मृत्यू असा अचानक झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. शिंके आल्याने मृत्यू होऊ शकतो, यावर कुणाचाच विश्वास बसला नाही. या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून नरेंद्र सिंग नावाच्या युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 13:39 IST
Next Story
Viral Video: गोविंदाच्या ‘दुल्हे राजा’वर या मेंढपाळाचा भन्नाट डान्स; स्टेप्स पाहून नेटकरीही झाले फिदा