Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हायरल व्हिडीओ आपण दररोज पाहतो. ज्यातील बऱ्याच व्हिडीओंमुळे आपले मनोरंजन होते. पण, अनेकदा रील्सच्या नावाखाली अश्लील डान्सचे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे पाहून युजर्स प्रचंड संताप व्यक्त करताना दिसतात. लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणत्या थराला जातील हे सांगता येत नाही. पण, अनेकदा काही लोक त्यांच्या साधेपणामुळेदेखील लोकप्रिय होतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक तरुणी सुंदर डान्स करताना दिसत आहे.
दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. त्यात मजेशीर, तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो. डान्स केल्यावर शरीराचा व्यायाम तर होतोच; पण मनही शांत होते. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये महिला अनेकदा एकत्र आल्या की, एखाद्या गाण्यावर डान्स सादर करून दाखवतात. डान्सची असणारी आवड त्यांना शांत बसू देत नाही. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही तुम्हाला असंच काहीतरी पाहायला मिळेल.
समाजमाध्यमांवर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी अतिशय सुरेख असा डान्स करताना दिसत आहे. हा डान्सचा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. तुम्ही आजवर अनेक डान्स व्हिडीओ पाहिले असतील. पण या तरुणीच्या डान्सने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सोशल मीडियावर कधी डान्स, तर कधी गाणी, कधी अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. त्यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता एका तरुणीचा डान्स खूप व्हायरल होत आहे, ज्यातील तिच्या डान्सचं नेटकरी भरभरून कौतुक करताना दिसत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी ‘बदली बदली लागे’ या हरियाणी गाण्यावर अतिशय सुंदर डान्स करत आहे. तसेच तिच्या चेहऱ्यावरील हावभाव देखील पाहण्यासारखे आहेत. तिचा हा डान्स पाहून नेटकरीही सोशल मीडियावर अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @unfiltered.muskan13 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत अनेक व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या असून, अनेक युजर्स व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरनं लिहिलंय, “सपनी चौधरीच्या गाण्यावर कमाल केली हिने”, तर दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “असा डान्स आजवर कधीच पाहिला नाही”, तर आणखी एकानं लिहिलंय, “काय नाचली राव ही”.
