सोशल मीडियावरून मिळणाऱ्या प्रसिद्धीसाठी लोक आता हद्दच पार करू लागले आहेत. काही लाईक्स आणि व्ह्युजसाठी स्वत:ला इन्फ्लुएन्सर म्हणवणारे काही लोक मर्यादा ओलांडत आहेत. सोशल मीडियावर रील्स करून व्हायरल होण्याची नशा आजकालच्या पिढीतल्या काहींना लागली आहे. या व्हायरल व्हिडीओंचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अगदी रेल्वेस्थानकावर, मेट्रोत, मैदानात, सार्वजनिक ठिकाणी मिळेल त्या जागेवर हे रीलस्टार व्हिडीओ शूट करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक तरुणी चक्क ब्रा घालून भररस्त्यात फिरतेय.

तरुणीने हद्दच पार केली

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुण मुलगी इंदौरमधील एका ठिकाणी ब्रावर फिरताना दिसतेय. कसलीही लाज न बाळगता ती अगदी बिनधास्त गर्दीत फिरत आहे. तिथे असलेल्या लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आणि फक्त काही लाईक्स आणि व्ह्युजसाठी ती हे सगळं करत असल्याचं दिसतंय. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी कमेंट करत संताप व्यक्त केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @explorer_in_indore या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “इंदूर, ५६ दुकानाजवळ एका रीलसाठी ब्रावर फिरणारी मुलगी” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल २.६ मिलियन व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “इंदौरमध्ये अशा लोकांना घुसू नाही दिलं पाहिजे.” तर दुसऱ्याने “त्यांचे पालक दुसऱ्या राज्यात राहतात आणि त्यांना वाटते की त्यांची मुलगी इंदूरला शिकण्यासाठी गेली आहे किंवा तिथे काम करत आहे… स्वातंत्र्याच्या नावाखाली संस्कृतीचा बळी दिला गेला आहे,” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “अशा लोकांना अटक करायला पाहिजे, सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात”, अशी कमेंट एकाने केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young girl wearing bra in indore market shocking video viral on social media dvr