सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ असे असतात की ते पाहून कोणीही थक्क होईल. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओतील तरुणाचे टॅलेंट पाहून तुम्ही थक्क व्हाल. तसे, आपल्या देशात टॅलेंटची कमतरता नाही. आता या तरुणाला पाहून तुम्ही म्हणू शकता की की याच्याकडे एक अद्भुत टॅलेंट आहे. हा तरुण अनेक प्राण्यांचे आवाज काढण्यात पटाईत आहे. सोशल मीडियावर प्रत्येकजण त्याच्या आवाजाने खूप प्रभावित झाला आहे.
तरुणाचे टॅलेंट पाहून तुम्ही त्याचे फॅन व्हाल..
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस या तरुणाला गाढवाचा आवाज काढायला सांगतो. यानंतर तो तरुण गाढवाचा आवाज काढतो. तरुण गाढवाच्या खऱ्या आवाजाशी जुळणारा आवाज काढतो. तरूण एकामागून एक प्राण्यांचे आवाज काढतो. त्यानंतर तो मोराचा आवाज काढतो. हा आवाज ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. काही वेळाने हा तरुण कावळ्याच्या आवाज काढतो. या तरुणाने काढलेले अनेक प्राण्यांचे आवाज अगदी खरेखुरे वाटतात. तुम्हीही या तरुणाचे टॅलेंट एकदा पाहाच..
येथे पाहा व्हिडिओ
( हे ही वाचा: दाढी करून आलेल्या वडिलांना पाहून चिमुरड्याने दिली भन्नाट प्रतिक्रिया; चेहऱ्यावरील ‘तो’ भाव पाहून प्रेक्षकही झाले फिदा)
हा व्हिडिओ एका इंस्टाग्राम यूजरने पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ ३० लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर ३ लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. या व्हिडीओवर २ हजारांहून अधिक लोकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, या टॅलेंटने भारताबाहेर जाऊ नये. एका इंस्टा युजरने लिहिले की, हा मानवी रूपातील प्राणी आहे. त्याचवेळी एका यूजरने लिहिले की, मागच्या जन्मात घोडा होता का? व्हिडिओवर अशा अनेक कमेंट्स आल्या आहेत, ज्या पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरू शकणार नाही.