Local Train Viral Fight Video: प्रवासादरम्यान अनेक वेळा सीटवरून प्रवाशांमध्ये वाद होत असतात. लांबचा प्रवास करणार्या प्रवाशाला पुढच्या प्रवासासाठी बसायला जागा मिळत नाही आणि त्यासाठी मग तो वाटेल ते करू लागतो, तेव्हा भांडण होण्याची शक्यता असते. सीटवरून प्रवाशांमध्ये होत असलेला वाद अनेकदा सोशल मीडियावर पाहायला मिळतो, ज्याचे व्हिडीओ सर्रासपणे व्हायरल होतात, आणि नेटकरी देखील असे व्हिडीओ खूप एन्जॉय करतात. आतापर्यंत तुम्ही लोकलमधील महिलांच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. लोकलमधली महिलांची भांडण काही नवी नाही, त्यातल्या त्यात पुरुषांच्या भांडणाचे व्हिडीओ क्वचितच पाहायला मिळतात. असाच एक लोकलमधील दोन पुरुषांमधील भयानक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एका प्रवाशानं दुसऱ्या प्रवाशाला भांडणामध्ये थेट ट्रेनमधून खाली ढकललं आहे. याचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती आणि तरुणामध्ये काही कारणामुळे वाद होतो. यावेळी हा व्यक्ती तरुणाला काहीतरी विचारताना दिसत आहे. त्यानंतर तरुणाचे हात पकडून हा व्यक्ती त्याच्याशी भांडताना दिसत आहे, तेवढ्यात तरुणानं व्यक्तीच्या कानाखाली लगावली. या गोष्टीचा राग आल्यानं या व्यक्तीनंही तरुणाला मारहाण केली आणि शेवटी त्याला चक्क धावत्या ट्रेनमधूनच खाली ढकलून दिलं. घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला असून व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होत आहे.
पाहा व्हिडीओ
https://www.instagram.com/reel/DLShAHTSlW6/?utm_source=ig_web_copy_link
लोकलसेवा ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. या लोकलमधून लाखो नागरिक हे रोज प्रवास करत असतात. मात्र, लांबचा प्रवास करताना जागा मिळवण्यासाठी वादाचे प्रसंग उद्भवत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे नेहमीच होत असलेल्या अशा प्रसंगांवरून मुंबई लोकलचे हे प्रश्न कधी सुटतील हा प्रश्न पडतो.
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर only.accidents या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आता पर्यंत हजारो लोकांनी पाहिले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट देखील केल्या आहे. यात एका यूजरने लिहिले की, सीटसाठी वाद ही रोजची समस्या आहे. दुसऱ्या यूजरने लिहिले- क्षणभराचा राग आयुष्यभर पश्चाताप तर तिसऱ्याने लिहिले- सीटची समस्या ही संपूर्ण भारताची समस्या आहे. चौथ्याने लिहिले सीटसाठी रेल्वेमध्ये वाद हे नित्याचे झाले आहे.