सोशल मीडियावर रोज कित्येक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यामध्ये लोक हिंदी-इंग्रजी गाण्यावर नाचतानाचे व्हिडिओ पोस्ट करतात. काही लोक चांगले नृत्यही करतात पण काही लोक भररस्त्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी नृत्य करतानाचे व्हिडिओ पोस्ट करतात. अनेकदा नृत्याच्या नावखाली लोक विचित्र प्रयोग करताना दिसतात. प्रसिद्धीसाठी हे लोक काहीही करायला असतात. पण फार मोजके लोक असे असतात जे या सोशल मिडिया माध्यमाचा योग्य उपयोग करतात किंवा अत्यंत चांगल्या प्रकारे वापर करतात.

सोशल मीडियामुळे कोणताही विषय किंवा कोणतीही कला लोकांपर्यंत पोहचवणे सहज शक्य झाले आहे. सोशल मीडियाद्वारे लोप पावत चाललेली लोककला जोपसणारे आणि लोकांपर्यंत पोहचवणारे लोक फार कमी आहेत. सध्या अशाच एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती आपल्या अभिनयातून लोककला जोपासण्याचा आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.


सोशल मीडियावर एक तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे जिने सुया घे गं दाभण घे या जुन्या मराठी गीतावर अभिनय सादर केला आहे. पारंपारिक लोकगीत सादर करताना तिचा अभिनय पाहून नेटकरी तिच्या प्रेमात पडले आहेत. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.
व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर srushti_zemse_____ नावाच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये एका तरुणीने पांरपारिक पद्धतीची साडी आणि दागिने परिधान केले आहे. पारंपारिक पद्धतीने कुंकवाची चंद्रकोर कपाळी कोरली आहे. नाकात मराठमोळी नथही परिधान केली आहे. पारंपारिक महाराष्ट्रीय पोशाखामध्ये ती अत्यंत सुंदर दिसते आहे. ती तरुणी सुया घे गं दाभण घे या लोकगीतावर अभिनय केला आहे.’

येथे पाहा व्हिडीओ


लोकगीताचे बोल

खाली बसा हो बाई साहब जरा!
डोकं खाजवू नका खर खरा
भांगाभांगात पावडर भरा,
उवा-लिंकाचा नायनाट करा
उवांची घ्या ही बारीक दातांची फणी
दाताचं दातवण घ्या गं कुणी
कुंकू घ्या कुणी काळ मणी…
बाई….सुया घे गं, दाभण घे.

चकण्या डोळ्याच्या राधा बाई,
तुम्हाला काजळ शोभा देई,
आकुड केसांच्या गोदा ताई, तुम्ही केसारी वापरा बाई,
टकामका बघतील साऱ्या जणी,
कुंकू घ्या कुणी काळ मणी,
दाताचं दातवण घ्या गं कुणी
कुंकू घ्या कुणी काळ मणी
बाई….सुया घे गं, दाभण घे.

नेटकऱ्यांना लावले वेड

व्हायरल व्हिडीओमध्ये तरुणीने गीतामधील प्रत्येक शब्दानुसार अभिनय केला आहे. तिचा हावभाव आणि अभिनय नेटकऱ्यांना प्रचंड आवडले आहेत.


व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी तिच्या अभिनय कौशल्याचे कौतुक केले आहे.

व्हिडीओवर कमेंट करताना एकाने म्हटले की, “खूप वेळा पाहिले, असे वाटते की तो आवाज तुझाच आहे.”

दुसरा म्हणाला की,”पाहून मनाला समाधान वाटलं”

तिसरा म्हणाला की,”अप्रतिम हावभाव”

चौथ्याने कमेंट केली की, “हावभाव इतके सुंदर आहे की वाटतचं नाही की हे गाणे खूप जुने आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाई….सुया घे गं, दाभण घे गीताबाबत

सन १९७४ साली ‘बाई सुया घे ग, दाभण घे’ हे गीत प्रकाश पवार यांनीत रचले आणि ते घराघरात पोहोचले. गायक प्रल्हाद शिंदे यांच्या घराण्यातील गायिका रंजना शिंदे यांनी आपल्या कर्णमधुर स्वरांनी हे गीत गायले व मधुकर पाठक यांनी त्या गीताला स्वरबद्ध केले.