Horror show at Kumbhar galli Karnataka:नुकताच देशभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. देशात-परदेशात घरोघरी, मोठ-मोठ्या मंडळांमध्ये गणरायाचं आगमन झालं आणि अवघ्या दहा दिवसांच्या मुक्कामानंतर १७ सप्टेंबरला गणपती बाप्पाने सर्वांचा निरोपदेखील घेतला. खरं तर गणेशोत्सवासाठी बाप्पाच्या आगमनाची तयारी महिनाभर आधीपासूनच सुरू होते. सुंदर डेकोरेशन, फुलांची आरास, दारात रांगोळी काढून गणरायाचं स्वागत केलं जातं.

गणेशोत्सवात मोठ-मोठ्या मूर्तींसह आणखी एक आकर्षणाचा भाग म्हणजे डेकोरेशन आणि शो (चलतचित्र). आजकाल बहुतेक ठिकाणी हटके डेकोरेशन असावं असा सगळ्यांचा अट्टहास असतो. तसेच डेकोरेशनसह आधी ठिक-ठिकाणी चलतचित्र, छोटसं नाटक दाखवून भाविकापर्यंत मोलाचा संदेश द्यायचा प्रयत्न अनेक मंडळांचा असायचा. पण, आता हळूहळू ते बंद होताना दिसत आहे. काही ठिकाणी मात्र अजूनही असे शो भाविकांना दाखवले जातात. पण, सध्या सोशल मीडियावर गणेशोत्सवात आयोजित केलेल्या अशाच एका हटके कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एका मंडळाने भाविकांसाठी चक्क हॉरर शोचं आयोजन केलं आहे.

Viral Reel Shows Child Hanging As Mother Holds Her With One Hand While Posing Sitting On Well's Fence video
“अगं आई ना तू?”, रीलसाठी महिलेनं पोटच्या लेकराला मृत्यूच्या दारात नेलं; VIDEO पाहताना तुम्हीही रोखून धराल श्वास
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
The lion came with the speed of the wind and attacked the cheetah
जगण्यासाठी शिकार महत्त्वाची! वाऱ्याच्या वेगाने आला सिंह अन् केला चित्यावर हल्ला; पुढच्या पाच सेकंदांत जे घडलं… VIDEO पाहून अंगावर येईल काटा
indian railway viral video
“सीट घरी घेऊन जाणार आहेस का?” ट्रेनमध्ये विनातिकीट प्रवाशाची दादागिरी; म्हणतो कसा…; पाहा video
Teacher running towards classroom to resolve fight students gave surprise viral video
विद्यार्थ्यांची मारामारी होताच वर्गात धावत गेली शिक्षिका अन्…, पुढे घडलं काही भलतंच, पाहा VIRAL VIDEO
Mumbai: Video Of Last Man To Take Darshan Of Lalbaugcha Raja Goes Viral
“वेळ बदलायला वेळ लागत नाही” तासाभरापूर्वी रांगेत चेंगरणारा क्षणात VIP झाला; लालबागच्या राजाचा सर्वात नशिबवान भक्त; पाहा VIDEO
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?
delhi society notice viral
Notice for Bachelors: बॅचलर्ससाठी दिल्लीतील सोसायटीची नोटीस; “एवढे पार्सल मागवू नका, फारतर १ किंवा २…”, नेमकं घडलं काय?

हेही वाचा… “आंटी नंबर १”, ट्रिपल सीट घेऊन काकूंनी चालवली स्पोर्ट्स बाईक, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले…

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, हॉरर शो पाहण्यासाठी गणेशभक्तांची मोठीच्या मोठी रांग लागली आहे. गणरायाचे आशीर्वाद घेण्यासाठी तर भाविक जमलेच आहेत, परंतु इथल्या प्रसिद्ध हॉरर शोसाठी माणसं जास्त उत्सुक असल्याचं पाहायला मिळतंय. जशी भाविकांची या शोसाठी एन्ट्री होते, तसं समोरून एक भयावह भुताच्या पोशाखात असलेला माणूस येतो.

वेगवेगळे भयावह मुखवटे, सांगाडे, आजूबाजूला लावलेल्या वेली आणि काळोख असे भीतीदायक वातावरण तयार केलं आहे. हा शो पाहण्यासाठी तरुण-तरुणी, पालकांसह लहान मुलांचीही येथे उपस्थिती आहे. हॉरर शो पाहून अनेक जण घाबरल्याचं, तसंच काही जण भीतीमुळे चक्क रडायलादेखील लागल्याचं आपण या व्हिडीओतून पाहू शकतो.

हेही वाचा… नवरदेव जोमात! हळदीला नवऱ्याने केला भन्नाट डान्स, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले, “काहीही…”

कर्नाटक येथील निपाणीमध्ये कुंभार गल्ली येथे १० दिवसांसाठी हे भव्य भुतांचं नाटक आयोजित केलं होतं. हा व्हिडीओ @kumbhar_galli_nippan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला तब्बल 1.7 मिलियन व्ह्यूज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

हा खतरनाक व्हिडीओ पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “अरे कोणालातरी अटॅक येईल ना.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “लोक दर्शनाला येतात, तुमची फालतुगिरी बघायला नाही येत.” तर एकाने आपला अनुभव शेअर करत कमेंट केली आणि लिहिलं, “माझी मुलगी स्वरा बोलली की परत आयुष्यात कधीपण असलं भूत पाहायला जाणार नाही. ती खूप घाबरून थर थर कापत होती.”